पुन्हा एकाला अटक आरोपींची संख्या तीनवर
By Admin | Updated: May 20, 2015 02:25 IST2015-05-20T02:25:06+5:302015-05-20T02:25:06+5:30
येथील स्टेशन फैल परिसरात झालेल्या हत्याप्रकरणात सोमवारी रात्री आणखी एकाला अटक करण्यात आली.

पुन्हा एकाला अटक आरोपींची संख्या तीनवर
वर्धा : येथील स्टेशन फैल परिसरात झालेल्या हत्याप्रकरणात सोमवारी रात्री आणखी एकाला अटक करण्यात आली. त्यामुळे घटनेतील आरोपींची संख्या आता तीन झाली आहे. तिघांनाही मंगळवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना २८ मेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. तिसऱ्या आरोपीचे नाव गोलू शेख असे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
स्टेशन फैल परिसरात तुरक लॉन लग्न समारंभात मटणावरुन झालेल्या वादात चाकूने भोसकून मोहम्मद इमरान मोहम्मद शेख याची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपास केला. तपासाअंती निशाद शेख व बाबा शेख उर्फ खान या दोघांना सायंकाळी अटक करण्यात आली. यातील तिसरा आरोपी फरार होता. त्याच्या शोधात पोलीस असताना तो रात्री वर्धेत आल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. यावरून ठाणेदार एम.बुराडे व गुन्हे अन्वेशन विभागाच्या पोलिसांनी घटनास्थळ गाठून त्याला अटक केली. प्रकरणाचा तपास शहर पोलीस करीत आहे.(प्रतिनिधी)