भोलेश्वरीला पूर नसला तरी रोहण्यात समस्यांचा महापूर

By Admin | Updated: August 5, 2016 02:07 IST2016-08-05T02:07:11+5:302016-08-05T02:07:11+5:30

यंदाच्या पावसाळ्यात अजून जरी भालेश्वरी नदीला मोठा पूर आला नसला तरी गावात मात्र समस्यांचा महापूर आहे.

Though Bholeshwari does not have floods, | भोलेश्वरीला पूर नसला तरी रोहण्यात समस्यांचा महापूर

भोलेश्वरीला पूर नसला तरी रोहण्यात समस्यांचा महापूर

रोहणा : यंदाच्या पावसाळ्यात अजून जरी भालेश्वरी नदीला मोठा पूर आला नसला तरी गावात मात्र समस्यांचा महापूर आहे. या गावात अतिक्रमण, अंतर्गत रस्त्यांची खस्ताहालत, रस्त्यांवर मटन मार्केट मुख्य रस्त्यावरील ठेंगणा पूल, वस्तीतील नागरी सुविधांचा अभाव नदीचे खोलीकरण पांदण रस्त्यावरील अतिक्रमणाने नामशेष झालेल्या पांदणी, जिर्ण अवस्थेत असलेली पाणी पुरवठा योजना, आठवडी बाजारातील अस्वच्छता व नव्यानेच बांधलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची खस्ताहालत या समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
बस स्थानकवर बसेस उभ्या राहायला जागा नाही एवढे रस्त्यावर अतिक्रमण झाले आहे. तर गावातील रस्ते गल्लीत रूपांतरीत झाले आहे. आधी थोडा आडोशाला भरणारा मटन बाजार आजा ऐन रस्त्यावर आला आहे. विद्युत वाहून नेणाऱ्या तारा झालेल्या अनेक घरावरून गेल्या आहेत. तर विद्युत खांब काहींच्या घरात आले आहे. बस स्थानकावरून गावात जाताना लागणारा भोलेश्वरीवरील पूल अत्यंत ठेंगणा व अरूंद असल्याने रहदारी असुरक्षित झाली आहे. १० वर्षापूर्वी आर्वी पुलगाव मार्गावरील बसस्थानक परिसरात वसलेली आदिवासी लोकांची वस्ती स्थलांतरीत केली असून या वस्तीत जाण्यासाठी अधिकृत रस्ता नाही तर अनेक नागरिक सुविधांचा अभाव आहे. उथळ झालेली भोलेश्वरी नदीचे पात्र खोल करण्याचा प्रश्न गत कित्येक वर्षांपासून खितपत पडला आहे. निधी येतो अन् परत जातो याचे कारण मात्र गाकवऱ्यांना समजले नाही. पन्नास वर्षे वयाची झालेली पाणी पुरवठा योजनाअंतर्गत जिर्ण झाली असून श्रेय लाटण्याचा प्रतिष्ठेपायी मंजूर झालेली १ कोटी ४४ लाखाची नवीन पाणी पुरवठा योजना रद्द झाली आता या योजनेचे नशीव केव्हा उघडेल हे सांगणे कठीण आहे. पावसाळ्याच्या दिवसात असणारी अस्वच्छता किळसवाणी असून आरोग्यास हानिकारक आहे.(वार्ताहर)
 

Web Title: Though Bholeshwari does not have floods,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.