‘त्या’ युवकांकडून देशी कट्टा खरेदीचा प्रयत्न
By Admin | Updated: January 11, 2016 01:51 IST2016-01-11T01:51:38+5:302016-01-11T01:51:38+5:30
येथील पोलिसांनी संशयावरून पकडलेल्या कारमध्ये शस्त्रसाठा आढळल्याने पाच जणांना अटक केली.

‘त्या’ युवकांकडून देशी कट्टा खरेदीचा प्रयत्न
पोलीस तपासात खुलासा : जप्त केलेल्या कारमध्ये मात्र कट्टा नाही
तळेगाव (श्यामजीपंत) : येथील पोलिसांनी संशयावरून पकडलेल्या कारमध्ये शस्त्रसाठा आढळल्याने पाच जणांना अटक केली. ताब्यात असलेले पाचही जण तळेगाव येथे देशी कट्टा खरेदीकरण्याकरिता आल्याचा खुलासा पोलीस तपासात झाला आहे. अटकेत असलेल्या नागपूर, हिंगणा व कारंजा येथील या पाच युवकांना या व्यवहाराकरिता कारंजा (घा.) येथील रहिवासी मिथून बावरी याने मध्यस्थी केल्याचीही माहिती आहे.
पोलिसांनी शनिवारी केलेल्या कारवाईत विलास शेंडे, अंकुश सोनवने, वेणूगोपाल देशमुख्य आणि निलेश पिंपळे व बावरी अशा पाच जणांना अटक केली होती. पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सदर युवक नागपूर येथून प्रथम कारंजा येथे आले. तेथून ते मिथून बावरीला घेवून तळेगावला आले होते. याच काळात तळेगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिनेश झामरे, प्रमोद हरणखेडे, निलेश पेटकर, अनिल मसराम, गणेश आत्राम, आशिष नेवारे, मनोज काकडे यांनी आष्टी टी पॉर्इंटवर सदर वाहनाची संशयावरून झडती घेली. यात दोन गुप्ती व लोखंडी रॉडसह इतर साहित्य जप्त करण्यात आले. मात्र यात देशी कट्टा मिळाला नाही.तळेगाव पोलिसांनी या पाचही जणांना अटक करून त्यांना न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी देण्यात आली. या माहितीला पोलिसांनी दुजोरा दिला.(वार्ताहर)