संजय गांधी निराधारच्या लाभार्थ्यांसाठी ‘ती’ अट रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 23:50 IST2017-10-31T23:50:33+5:302017-10-31T23:50:51+5:30
संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाºयांच्या बँक खात्यात शासकीय मदत जमा केली जाते. परंतु, लाभार्थ्यांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये जमा असल्यासच त्याला योजनेचा लाभ मिळत आहे.

संजय गांधी निराधारच्या लाभार्थ्यांसाठी ‘ती’ अट रद्द करा
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाºयांच्या बँक खात्यात शासकीय मदत जमा केली जाते. परंतु, लाभार्थ्यांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये जमा असल्यासच त्याला योजनेचा लाभ मिळत आहे. बँक खात्यात कमीतकमी तीन हजाराची रक्कम असणे ही अट शिथिल करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक सौरभ तिमांडे यांनी उपविभागीय महसूल अधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
समाजातील दुर्बल घटक असलेले संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत. त्याची पूर्वीच आर्थिक परिस्थिती हलाकीची आहे. त्यांच्याकडून बँक खात्यात तीन हजार रुपये इतकी रक्कम नेहमीच शिल्लक ठेवणे त्यांना आर्थिक दृष्ट्या न परवडणारेच आहे. कुसुम शंकर नलोडे, रा. गोमाजी वॉर्ड हिंगणघाट ही महिला बँकेत गेली असता तेथील कर्मचाºयांनी तिला बँक अकाऊंटमध्ये तीन हजार भरण्याचे सांगितले. ही निंदनिय बाब आहे. संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाºयांची आर्थिक स्थिती लक्षात घेता सदर अन्यायकारक ठरणारी अट रद्द करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.