चोरट्यांनी पळविल्या कचरा पेट्या

By Admin | Updated: August 29, 2014 00:02 IST2014-08-29T00:02:05+5:302014-08-29T00:02:05+5:30

‘कार्य आमचे सहकार्य तुमचे’, असे घोषवाक्य कचरा पेट्यांवरील पाट्यांवर ग्रामपंचायत प्रशासनाने लिहिले़ सहकार्यातून स्वच्छता, असा उद्दात्त हेतू ग्रामपंचायतीचा होता; पण या वाक्यालाच हरताळ

The thieves have run into rubbish boxes | चोरट्यांनी पळविल्या कचरा पेट्या

चोरट्यांनी पळविल्या कचरा पेट्या

सेवाग्राम : ‘कार्य आमचे सहकार्य तुमचे’, असे घोषवाक्य कचरा पेट्यांवरील पाट्यांवर ग्रामपंचायत प्रशासनाने लिहिले़ सहकार्यातून स्वच्छता, असा उद्दात्त हेतू ग्रामपंचायतीचा होता; पण या वाक्यालाच हरताळ फासण्याचे काम चोरट्यांनी केले़ गावातील कचरा पेट्याच चोरट्यांनी लंपास केल्या़ यामुळे गावात कचरा कुठे टाकावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे़
माजी सरपंच सूमन झाडे व उपसरपंच सुनील कोल्हे यांच्या कार्यकाळात प्रभाग क्ऱ १ व २ मध्ये नऊ कचरा पेट्या लावण्यात आल्या़ ओला आणि सुका, असा सर्व प्रकारचा कचरा नागरिकांनी या पेट्यांमध्ये प्रामाणिकपणे टाकण्यास सुरूवात केली़ बकालपण निर्माण होणार नाही, दुर्गंधी परसरणार नाही, असे प्रयत्नही ग्रामस्थांनी केले; पण यात सेवाग्राम ते नांदोरा मार्गावरील तसेच गोठाण परिसरातील कचरा पेट्या चोरट्यांनी लंपास केल्या़ आता कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वी ग्रामपंचायत प्रशासनाने प्रत्येक प्रभागामध्ये पाच याप्रमाणे याच प्रभागामध्ये सिमेंटचे ढोले कचरा पेटी म्हणून दिले होते. ते मोठे असल्याने कचऱ्याचा संग्रह अन्य ढोल्यांचा उपसा करेपर्यंत होत होता; पण या दोन प्रभागातील पेट्या लवकरच भरतात़ यामुळे कचरा खाली फेकण्याची वेळ नागरिकांवर आली आहे़ स्वच्छतेचा भार एकट्या व्यक्तीवर असल्याने तो कामांना न्याय देऊ शकत नाही़ शिवाय नागरिकांचेही समाधान करू शकत नाही. यामुळे नव्या पेट्यांपेक्षा जुने ढोलेच चांगले होते, अशी प्रतिक्रीया नागरिकांतून उमटत आहेत़ गावातील कचऱ्याच्या पेट्याही चोरटे लंपास करीत असल्याने ग्रा़पं़ प्रशासनावरही नव्याने खर्च करण्याची वेळ आली आहे़ पेट्या लहान व कचरा साठविण्यास अक्षम असल्याने गावात सध्या कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याचे दिसते़ नवनिर्वाचित सरपंच रोशना जामलेकर, उपसरपंच व ग्रा़पं़ सदस्यांनी याकडे विशेष लक्ष देत स्वच्छ व सुंदर गाव निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी होत आहे़ (वार्ताहर)

Web Title: The thieves have run into rubbish boxes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.