‘ते’ खांब ठरताहेत अपघाताला कारणीभूत
By Admin | Updated: November 1, 2015 02:34 IST2015-11-01T02:34:21+5:302015-11-01T02:34:21+5:30
येथील १ किमी रस्त्याचे बांधकाम व सौंदर्यीकरण १ कोटी ९० लाख रु. खर्चून केले जात आहे. परंतु बांधकाम करताना रस्त्यालगत...

‘ते’ खांब ठरताहेत अपघाताला कारणीभूत
प्रशासनाचे दुर्लक्ष : खांब कायम ठेवून रस्त्याचे रुंदीकरण
अल्लीपूर : येथील १ किमी रस्त्याचे बांधकाम व सौंदर्यीकरण १ कोटी ९० लाख रु. खर्चून केले जात आहे. परंतु बांधकाम करताना रस्त्यालगत वळणमार्गावर असलेले विजेचे तीन खांब अपघाताची शक्यता असतानाही तसेच ठेवण्यात आले आहे. हे खांब अपघातास निमंत्रण देत असून ते सरकवैणे गरजेचे झाले आहे.
येथील वळणरस्त्यावर लागोपाठ तीन विद्यूत खांब आहेत. या रस्त्याचे दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे. या मार्गावर आरोग्य केंद्रासमोरील वळण रस्त्यावरचे लागोपाठ तीन खांब अगदी रस्त्याच्या जवळ येत आहे. त्यामुळे पुढे जाऊन येथे अपघाताची शक्यता आहे. सदर खांब वीजप्रवाहित असल्याने ते हटविणे गरजेचे आहे. असे असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सदर खांब दूसऱ्या ठिकाणी स्थानांतरीत करण्याची मागणी नागरिक करीत आहे.(वार्ताहर)
ग्रामपंचायत व वीजवितरणला दिली नोटीस
सदर खांबासंदर्भात ग्रा.पं. व विद्युत वितरण कंपनीला नोटीस देण्यात आला आहे. तसेच खांबही हस्तांततित करण्यात आल्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग हिंगणघाटचे शासकीय अभियंता कुहीकर यांची सांगितले. त्यामुळे येथील खांब केव्हा हटविले जातात याकडे ग्रामस्थांचे व या मार्गावरील प्रवाश्यांचे लक्ष लागले आहे.