भररस्त्यात कंटेनर झाला आडवा...
By Admin | Updated: July 25, 2015 02:19 IST2015-07-25T02:19:40+5:302015-07-25T02:19:40+5:30
शहरात दिवसा अवजड वाहनांना प्रवेशबंदी आहे. असे असतानाही यवतमाळकडे जाणारा एक कंटेनर शहरात शिरला.

भररस्त्यात कंटेनर झाला आडवा...
शहरात दिवसा अवजड वाहनांना प्रवेशबंदी आहे. असे असतानाही यवतमाळकडे जाणारा एक कंटेनर शहरात शिरला. परंतु बजाज चौकात कारवाई होणार हे कळताच कंटेनरचालकाने ठाकरे मार्केट चौकातून वाहन वळविले. परंतु वळविताना कंटेनरने अनेक दुकानांचे नुकसान केले. यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.