पतसंस्थांच्या सभेवर अद्यापही निर्णय नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 05:01 IST2020-08-26T05:00:00+5:302020-08-26T05:01:00+5:30
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नोंदणीकृत सहकारी पतसंस्था आहेत. या संस्थेच्या माध्यमातून शेतकरी ते नोकरदार वर्गांना आवश्यक परिस्थितीत आर्थिक पाठबळ देण्याचे काम संस्था करीत असल्याने हक्काच्या आणि गरजेच्या वेळी आर्थिक संकट दूर करण्याचे काम पतसंस्थेच्या माध्यमातून होत असते. प्रत्येक विभागाच्या पतसंस्था असून सभासद संख्या सुध्दा मोठी आहे. सभासदांना सहजतेने व सुलभ पध्दतीने कर्ज पुरवठा होत असल्याने सभासद आपल्याच पतसंस्थेतून कर्ज घेत असतात.

पतसंस्थांच्या सभेवर अद्यापही निर्णय नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव सतत वाढत असल्याने सरकारने सभा, विविध कार्यक्रम यावर बंदी घातली आहे. याचा फटका सहकारी पतसंस्थांना बसला असून लाभांश वितरणही थांबले आहे. लॉकडाऊन असल्याने सप्टेंबरमध्ये सकारात्मक निर्णय व्हावा अशी आशा सभासद ठेवून आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नोंदणीकृत सहकारी पतसंस्था आहेत. या संस्थेच्या माध्यमातून शेतकरी ते नोकरदार वर्गांना आवश्यक परिस्थितीत आर्थिक पाठबळ देण्याचे काम संस्था करीत असल्याने हक्काच्या आणि गरजेच्या वेळी आर्थिक संकट दूर करण्याचे काम पतसंस्थेच्या माध्यमातून होत असते. प्रत्येक विभागाच्या पतसंस्था असून सभासद संख्या सुध्दा मोठी आहे. सभासदांना सहजतेने व सुलभ पध्दतीने कर्ज पुरवठा होत असल्याने सभासद आपल्याच पतसंस्थेतून कर्ज घेत असतात. दरवर्षी पतसंस्थेच्या आमसभेत सभासदाना लाभांश वितरीत करण्यात येतो. लाभांशची रक्कम कर्जावर असल्याने एक रक्कम सभासदांना मिळत असल्याने याचा उपयोग सभासदांना होत असतो. आमसभा ही नेमकी पावसाळ्यात ऑगस्ट महिन्यात होत असते.पण संचारबंदी कायम असल्याने आमसभा होण्याचे शक्यता दिसत नाही.त्यामुळे लाभांश सुध्दा रखडला आहे. कोरोनाच्या संकटामुळे संचारबंदी, लॉकडाऊन ३१ आॅगस्टपर्यंत असल्याने कुठल्याही सभेला, आमसभेला परवानगी नसल्याने लाभांशाचे वितरणही थांबले आहे.
जिल्हा उपनिबंधक वर्धा यांना पत्र दिले आहे. अजून कुठलीही सूचना आमसभा आणि लाभांश वितरणाबाबत आलेली नाही.पत्राच्या उत्तराची संस्थेलाही प्रतीक्षा आहे.
- चंद्रकांत ठाकरे,
अध्यक्ष माध्यमिक शिक्षक शिक्षकेत्तर सहकारी कर्मचारी पतसंस्था वर्धा.