कृषी विभागाचे अद्याप सर्वेक्षण नाही
By Admin | Updated: July 12, 2014 23:51 IST2014-07-12T23:51:38+5:302014-07-12T23:51:38+5:30
रोहिणी, मृग, आश्लेषा या तीनही नक्षत्रामध्ये पूरेसा पाऊस न आल्याने दुष्काळाचे सावट पसरले आहे़ असे असले तरी अद्यापही कुषी विभागाने सर्वेक्षणाचे काम हाती घेतले नाही़ यामुळे नुकसान भरपाई मिळणार की नाही,

कृषी विभागाचे अद्याप सर्वेक्षण नाही
दुबार पेरणीचे संकट : नुकसान भरपाईबाबत संभ्रम
वर्धा : रोहिणी, मृग, आश्लेषा या तीनही नक्षत्रामध्ये पूरेसा पाऊस न आल्याने दुष्काळाचे सावट पसरले आहे़ असे असले तरी अद्यापही कुषी विभागाने सर्वेक्षणाचे काम हाती घेतले नाही़ यामुळे नुकसान भरपाई मिळणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़
जिल्ह्यात बहुतांश शेतकऱ्यांनी १६ जून रोजी पहिला पाऊस आल्यानंतर मोठ्या आनंदाने बी-बियाणे, खते खरेदी करून पेरणी केली; पण त्यानंतर २० दिवस लोटूनही पावसाच्या सरी बरसलेल्या नाही़ यामुळे पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात अंकूरलेली रोपटी करपलीत़ शेतकऱ्यांनी कपाशीची अधिक लागवड केली होती़ शिवाय काही प्रमाणात सोयाबीनची पेरणीही करण्यात आली होती़ यात शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले़ पवनी येथील शेती पूर्णत: पावसावर अवलंबून आहे़ यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागत आहे़ कपाशीचा पेरा अधिक असून अंकूरलेली रोपटी जळालीत़ याबाबत अद्यापही कृषी विभागाने पवनी गावातील सर्वेक्षण केले नाही़ शिवाय नुकसानीची कुठेही नोंद करण्यात आली नाही़ कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत सर्वेक्षण करावे व नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे़ (कार्यालय प्रतिनिधी)