परिश्रम घेण्यावाचून पर्याय नाहीच

By Admin | Updated: May 28, 2015 01:33 IST2015-05-28T01:33:15+5:302015-05-28T01:33:15+5:30

नियमित अभ्यास हाच यशाचा मार्ग हे आतापर्यंतच्या अनुभवातून पुरतं कळलं होतं.

There is no substitute for exertion | परिश्रम घेण्यावाचून पर्याय नाहीच

परिश्रम घेण्यावाचून पर्याय नाहीच

वर्धा : नियमित अभ्यास हाच यशाचा मार्ग हे आतापर्यंतच्या अनुभवातून पुरतं कळलं होतं. त्यामुळेच आज सर्वात आनंदाचा क्षण अनुभवास मिळत आहे. हे सर्व अभ्यासाचे नियोजन आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळेच शक्य झाल्याचे ९६.३१ टक्के गूण मिळवून जिल्ह्यात प्रथम आलेला अंकित अरविंद लुटे सांगतो. तसेच अभियंता होऊन प्रशासकीय सेवेत जाण्याची इच्छाही तो व्यक्त करतो. जिल्ह्यातून प्रथम येण्याचा सुखद धक्का मात्र अविस्मरणीय क्षण असल्याचे अंकित सांगतो आहे. विशेष म्हणजे जेईई परीक्षेतही तो जिल्ह्यातून प्रथम आला होता.

Web Title: There is no substitute for exertion