जिल्हाधिकारी कार्यालयात आता थेट प्रवेश नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 05:00 IST2020-07-15T05:00:00+5:302020-07-15T05:00:25+5:30

वर्ध्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत एकूण ७९ कोरोना बाधितांची नोंद घेतली असून त्यापैकी ४९ व्यक्ती वर्धा जिल्ह्यातील तर ३० व्यक्ती जिल्ह्याबाहेरील आहेत. आर्वी येथील भूमिअभिलेख कार्यालयातील कोविड बाधित कर्मचारी वर्धा शहरातील सिव्हील लाईन भागातील प्रशासकीय इमारतीत येऊन गेल्याने ही इतारतच तीन दिवसांकरिता सील करण्यात आली आहे.

There is no direct access to the Collector's Office now | जिल्हाधिकारी कार्यालयात आता थेट प्रवेश नाही

जिल्हाधिकारी कार्यालयात आता थेट प्रवेश नाही

ठळक मुद्देभेटीगाठीवर निर्बंध : भूमि अभिलेखचा कर्मचारी कोविड पॉझिटिव्ह निघताच उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात सध्या कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सोमवारी प्रशासकीय इमारत सील करण्यात आल्यानंतर आज मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांना थेट जाण्यास मनाई करण्यात आली आहे. यामुळे विविध कामानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांच्या अडचणीत भर पडली असून रुग्ण संख्या वाढताच अधिकाऱ्यांनी स्वत:ला कार्यालयात क्वारंटाईन करून घेतले काय, असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.
वर्ध्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत एकूण ७९ कोरोना बाधितांची नोंद घेतली असून त्यापैकी ४९ व्यक्ती वर्धा जिल्ह्यातील तर ३० व्यक्ती जिल्ह्याबाहेरील आहेत. आर्वी येथील भूमिअभिलेख कार्यालयातील कोविड बाधित कर्मचारी वर्धा शहरातील सिव्हील लाईन भागातील प्रशासकीय इमारतीत येऊन गेल्याने ही इतारतच तीन दिवसांकरिता सील करण्यात आली आहे. अशीच परिस्थिती जिल्हाधिकारी कार्यालयावर ओढावू नये म्हणून आता वरिष्ठ अधिकाºयांच्या सूचनेवरून जिल्हाधिकारी कार्यालयात विविध कामानिमित्त येणाऱ्यांना थेट प्रवेश देण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मंगळवारी विविध कामानिमित्त आलेल्या अनेक नागरिकांना आल्या पावलीच परत जावे लागले. आम्ही कार्यालयात येत नाहीत; पण आमच्या प्रकरणांचे काय झाले याची माहिती आम्हाला द्यावी, अशी विनंतीच अनेक नागरिकांनी प्रवेश द्वारावर असलेल्या कर्मचाºयांकडे करीत होते.

प्रवेशद्वाराजवळ उभारला शामियाना
खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात आता सामान्यांना थेट प्रवेश नाकारला जात आहे. मंगळवारी या कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ तात्पूर्ता शामियाना उभारण्यात आला आहे. याच ठिकाणी नागरिकांच्या विविध तक्रारींचे अर्ज स्विकाले जात आहे. नागरिकांचे अर्ज स्विकारण्यासाठी काही कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

Web Title: There is no direct access to the Collector's Office now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.