शहरं
Join us  
Trending Stories
1
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
2
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
3
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
4
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
5
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
6
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
7
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
8
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
9
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
10
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
11
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
12
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
13
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
14
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
15
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
16
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
17
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
18
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
19
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
20
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू

कापूस वेचणीच्या संशोधन अहवालावर कार्यवाही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 12:43 AM

भारत हा जागतिक बाजारातील मोठा कापूस उत्पादक देश आहे; पण भारतात अनेक भागांत कापूस वेचणीचे काम महिला मजुरांकडून करून घेतले जाते.

ठळक मुद्देमहिला मजुरांना त्रास : यांत्रिकीकरणाकडे सरकारची पाठ

सुधीर खडसे।लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : भारत हा जागतिक बाजारातील मोठा कापूस उत्पादक देश आहे; पण भारतात अनेक भागांत कापूस वेचणीचे काम महिला मजुरांकडून करून घेतले जाते. यामुळे महिला मजुरांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन भारतीय कृषी कापूस अनुसंधान संस्थेने आॅक्टोबर २००४ मध्ये अभ्यास करून शासनाकडे निष्कर्ष अहवाल सादर केला होता. यावर कार्यवाही करून कापूस वेचणीच्या कामात यांत्रिकीकरण, महिलांचा त्रास कमी होणाºया बाबी अंमलात आणाव्या, अशा सूचना केल्या होत्या; पण या अहवालावर कोणतीही कार्यवाही अद्याप झाली नाही. यामुळे कापूस मजुरांच्या व्यथा कायमच आहेत.जगात भारत, पाकिस्तान, आॅस्ट्रेलिया, इस्राईल, अमेरिका या देशांमध्ये ९० टक्के कापसाचे उत्पादन होते. येथे कापूस वेचणीसाठी वापरण्यात येणाºया वेगवेगळ्या पद्धती आहेत. भारतात मात्र महिला मजुरांकडून कापूस वेचून घेतला जातो. पाच बोटांमध्ये कापूस पकडून तो बोंडाबाहेर काढण्याचे काम करण्यात येते. कापूस वेचणीची ही पद्धती अत्यंत त्रासदायक आहे. यामुळे महिलांना मोठा त्रास सहन करावा लागतो. यामध्ये मणक्याचे, कमरेचे आदी अनेक आजार आदी जडतात, असा निष्कर्ष अभ्यासकांनी काढला आहे.आॅक्टोबर २०१४ मध्ये भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने कापूस पिकावर जागतिक संशोधन केले. या संशोधनात कापूस वेचणीबाबत काही निष्कर्ष मांडलेत. त्यात भारत, पाकिस्तान आणि चीन या देशांत कापूस वेचणीसाठी यांत्रिकीकरणाचा वापर करण्याची टक्केवारी शून्य असल्याचे नमूद केले आहे. कापूस वेचणीसाठी मराठवाड्यातील परभणी येथील कृषी विद्यापीठाने कापडाचा खिसा असलेला कोट वापरण्याची सूचना केली होती. समोरच्या भागात साडेपाच किलो कापूस ठेवता येईल, अशा पद्धतीचा कोट तयार करण्यात आला होता; पण कापूस वेचणाºया महिला स्व-खर्चाने हा कोट खरेदी करीत नाहीत, असे आढळून आले आहे. भारतात कापूस वेचणीचे यंत्र तयार करण्यात आले आहे. हे यंत्र बोंडाजवळ नेल्यावर ५० ते ६० किलो कापूस एका तासात वेचता येतो. एका तासात १०० किलो कापूस वेचणे शक्य आहे; पण आपल्याकडे राज्य सरकारचा कृषी विभाग कापूस वेचणीच्या कामात यांंत्रिकीकरणाचा वापर करून घेण्याबाबत प्रचंड उदासीन आहे. त्यामुळे आजही महिलांना कापूस वेचणीचे काम करावे लागत असल्याची खंत नॅशनल हार्टिकल्चर मिशनचे संचालक चंद्रशेखर पडगिलवार यांनी व्यक्त केली आहे.यंदा कापूस वेचणी महागलीपूर्वी विदर्भाच्या विविध भागात एक महिला दिवसभर जितका कापूस वेचत होती, त्यानुसार किलोच्या आधारे तिला मजुरी दिली जात होती. यंदा मात्र शेतकºयांना २०० रुपये मजुरीवर महिलांना कापूस वेचणीच्या कामासाठी बोलवावे लागत आहेत. एक महिला साधारणत: २० ते २५ किलो कापूस दिवसभरात वेचते. पूर्वी १३० रुपयांत हे काम होत होते. आता २०० रुपये द्यावे लागत आहेत. म्हणजे ७० रुपये अधिकचे शेतकºयाला मोजावे लागत आहेत. त्यामुळे आता कापूस वेचणीसाठी यांत्रिकीकरणावर भर देणे गरजेचे झाले आहे. विदर्भात कापूस हे सर्वात महत्त्वाचे तथा ते नगदी पीक असल्याने शेतकरी यावरच निर्भर आहे.कापूस पिकावर संशोधनं होऊन शेतकºयांना शासकीय आधार मिळणे गरजेचे आहे. हे लक्षात घेऊनच संशोधनं केली जात आहेत; पण त्यावर अंमलबजावणी होत नसल्याचेच दिसून येत आहे. परिणामी, शेतकºयांना आजही वेचणीचा अधिक खर्च करावा लागत असल्याचे दिसून येत आहे.