शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

गुन्ह्याला माफी नाहीच ! जिल्ह्यात ५८ प्रकरणांत आरोपींना ठोठावली शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 17:44 IST

Wardha : झटपट न्यायदान होत असल्याने पीडितांना मिळतोय दिलासा, प्रलंबित प्रकरण निकाली काढण्याला गती

चैतन्य जोशी लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहाण्या माणसाने न्यायालयाची पायरी चढू नये, अशी म्हण आपल्याकडे प्रसिद्ध आहे. न्याय मिळवण्यासाठी होत असलेला उशीर आणि त्यामागे असणारी विविध कारणे यामुळे आपण न्यायालयात जायलाच नको, असे अनेकांचे म्हणणे असते. मात्र, जिल्हा न्यायालयातील चित्र काही वेगळेच असून, पीडितांना झटपट न्याय दिला जातो आहे. 'स्पेशल' कोर्टाने मागील वर्षभरात बलात्कार आणि बाल लैंगिक गुन्ह्यांपासून बचाव (पोक्सो) कायद्याशी संबंधित प्रलंबित खटले जलदगतीने निकाली काढत तब्बल ५८ प्रकरणांत आरोपी नराधमांना शिक्षा ठोठावली आहे. 

ई-फायलिंग, ऑनलाईन सुनावणी आदी विविध माध्यमातून न्यायालयात प्रलंबित असलेले दावे निकाली काढण्याचे प्रयत्न सध्या करण्यात येत आहेत. आजघडीला सर्वाधिक अल्पवयीन मुलींवर अत्याचार, त्यांचा छळ तसेच असभ्य वर्तणूक करण्याचे प्रमाणही वाढत चालले असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात दिसून येत आहे. पीडितांना न्याय दिला जातो आहे.

गतवर्षात ६२४ प्रकरणे होती न्यायप्रविष्ट...अल्पवयीन मुलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात 'स्पेशल' कोर्टात मागील वर्षभरात तब्बल ६२४ प्रकरणे न्यायप्रविष्ठ करण्यात आली होती. यात १ जानेवारी २०२४ च्या पूर्वीच्या शिल्लक असलेल्या ५१० प्रकरणांचाही समावेश आहे. त्यामुळे ११४ प्रकरणे नव्याने दाखल झाली होती. यापैकी १२१ प्रकरणांत न्यायाधिशांनी निकाल दिला असून, ५८ प्रकरणांत आरोपी नराधमांना शिक्षा ठोठावण्यात आली. तसेच ४४ प्रकरणे निर्दोष सुटली आहे.

सरकारी वकिलांचा युक्तिवाद महत्त्वाचा...जिल्हा सरकारी अभियोक्ता अॅड. गिरीश व्ही. तकवाले आणि सहायक सकारी अभियोक्ता विनय आर. घुडे यांच्यामार्फत शासनाकडून प्रकरणे न्यायालयात चालवली जातात. न्यायालयात सरकार पक्षाकडून करण्यात येणारा युक्तिवाद महत्त्वाचा ठरत असून, आरोपी गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. अनेक न्यायप्रविष्ट प्रकरणांत सरकारी पक्षाकडून होणारा युक्तिवाद पीडितांसाठी दिलासादायक ठरत असून, पीडितांना जलदगतीने न्याय मिळत आहे, हे तितकेच खरे. जलदगती न्याय मिळत असल्याने पीडितांसह त्यांच्या कुटुंबाला देखील दिलासा मिळतो आहे.

५०३ प्रकरण न्यायदानावर...पीडितांना जलदगतीने न्याय मिळण्यासाठी सरकारने १९ जून २०१२ रोजीपासून पोक्सो कायदा लागू केला. त्या अनुषंगाने अल्पवयीन मुलांवर होणाऱ्या छळप्रकरणांतील प्रकरणे स्पेशल कोर्टा'त चालवून जलदगतीने न्यायनिवाडा करण्यात येतो आहे. काही प्रकरणांत अल्पवयीन आरोपीदेखील असल्याने त्यांना बालसुधारगृहात पाठविण्यात आले असून, काही प्रकरणं रद्दही करण्यात आली आहेत. अजूनही ५०३ प्रकरणे न्यायप्रविष्ट असून, न्यायदानावर आहेत. लवकरच या प्रकरणांतही निकाल येत्या काही महिन्यांत लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

५८ प्रकरणात स्पेशल कोर्टाने ठोठावली शिक्षाछळाबाबत तब्बल ६२४ खटले दाखल करण्यात आले होते. यापैकी १२१ प्रकरण निकाली काढून ५८ प्रकरणांत न्यायाधीशांनी न्यायदान करत आरोपी नराधमांना शिक्षेसह दंडही ठोठावला आहे.

टॅग्स :wardha-acवर्धाCrime Newsगुन्हेगारी