शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

...तर व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या लावणार सोक्षमोक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 10:11 PM

येत्या २३ मे रोजी लोकसभेच्या निवडणुकीचा महत्त्वाचा भाग म्हणून मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होणार आहे. १४ टेबलवरून २७ फेºयामध्ये ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार असून एखाद्यावेळी एखादे ईव्हीएम सुरू न झाल्यास त्या मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्यांची पडताळणी करून मतमोजणी केली जाईल.

ठळक मुद्देभिमनवार : उमेदवारांसह राजकीय पुढाऱ्यांना दिली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : येत्या २३ मे रोजी लोकसभेच्या निवडणुकीचा महत्त्वाचा भाग म्हणून मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होणार आहे. १४ टेबलवरून २७ फेºयामध्ये ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार असून एखाद्यावेळी एखादे ईव्हीएम सुरू न झाल्यास त्या मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्यांची पडताळणी करून मतमोजणी केली जाईल. शिवाय ते मतदान गृहित धरले जाईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी दिली आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सोमवारी विशेष बैठक पार पडली. यावेळी ते उमेदवार व राजकीय पुढाऱ्यांना मतमोजणीबाबतची माहिती देताना बोलत होते.जिल्हाधिकारी भिमनवार पुढे म्हणाले, आर्वी, वर्धा व धामणगाव या विधानसभा क्षेत्रातील प्रत्येकी एक अशा तीन मतदान केंद्रावर मॉकपोल पुसला गेला नाही. या तीन केंद्राचे व्हीव्हीपॅट तपासणी करण्यात येईल. सकाळी ७ वाजता उमेदवारांच्या उपस्थितीत स्ट्राँग रूम उघडण्यात येईल. ईव्हीएम, ई.टी.बी.पी.एस. आणि पोस्टल मतदानाची मतमोजणी एकाच वेळी म्हणजे सकाळी ८ वाजता सुरू होईल. धामणगाव - २७, मोर्शी-२३, आर्वी-२३, देवळी-२४, हिंगणघाट २५ आणि वर्धा-२५ अशा विधानसभा क्षेत्रनिहाय फेºया होणार आहेत. ईव्हीएमची मतमोजणी झाल्यावर लकी ड्रॉ पद्धतीचा अवलंब करून अडीच तासांत व्हीव्हीपॅटमधील मतांची मोजणी करण्यात येईल. विधानसभा क्षेत्रनिहाय एक फेरी संपल्यावर लगेच दुसरी फेरी सुरू करण्यात येईल. पूर्वी सर्व सहाही विधानसभा क्षेत्रांच्या फेºया एकाचवेळी सुरू करण्याचे आदेश होते. मात्र, यामध्ये मतमोजणीला अधिक कालावधी लागू शकतो हे लक्षात घेता आयोगाने फेरी संपताच दुसºया विधानसभा क्षेत्राच्या फेरी संपण्याची वाट न बघता दुसरी फेरी सुरू करण्याच्या सूचना आयोगाने दिल्या आहेत, असेही यावेळी जिल्हाधिकारी भिमनवार यांनी सांगितले.याप्रसंगी जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी उपस्थितांना भारत निवडणूक आयोगाने मतमोजणी प्रक्रियेत वेळोवेळी केलेल्या बदल आणि नियमांची माहिती दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला अपर जिल्हाधिकारी संजय दैने, उपविभागीय अधिकारी निशिकांत सुके, उपजिल्हाधिकारी निवडणूक प्रवीण महिरे, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी प्रणय जोशी, माधव कोटस्थाने, पवन गोसेवाडे आदींची उपस्थिती होती.‘अ‍ॅप’वर पाहता येणार निकालनिवडणूक आयोगाने लोकसभेचा निकाल नागरिकांना आॅनलाईन व्होटर हेल्पलाईन अ‍ॅप आणि रिझल्ट डॉट ईसीआय डॉट गो डॉट इन या सुविधा अ‍ॅपवर तात्काळ दिसणार आहे. लोकांनी मतमोजणीच्या ठिकाणी गर्दी करू नये, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी केले आहे.