शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
5
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
6
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
7
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
8
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
9
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
10
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
11
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
12
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
13
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
14
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
15
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
16
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
17
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
18
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
19
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
20
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
Daily Top 2Weekly Top 5

५५ कोटी रुपयांचा महसूल गोळा करण्याचे होते उद्दिष्ट मात्र जिल्ह्यात अर्धीच उद्दिष्टपूर्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 18:39 IST

२७.३२ कोटींची वसुली : तीन महिन्यांत उद्दिष्टपूर्तीचे आव्हान

चेतन बेले लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : महसूल विभागाला शासनाकडून ५५ कोटी रुपयांचा महसूल गोळा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, नऊ महिन्यांत गौणखनिज महसुलाची फिफ्टी गाठण्यात यश आले. केलेल्या कारवाईत आतापर्यंत केवळ २७.६८ कोटींचीच वसुली करण्यात आली आहे. याची टक्केवारी ५०.३४ टक्के एवढी आहे, तर पुढील तीन महिन्यांत २७ कोटी ३२ लाख रुपये वसूल करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.

जिल्ह्यात अद्याप वाळू घाटांचा लिलाव झालेला नाही. मात्र, घर बांधकामासह इतर बांधकामासाठी वाळूची वाढती मागणी लक्षात घेता वाळू चोरट्यांकडून नदीपात्रातून वाळू चोरीचा सपाटा लावला आहे. महसूल विभागाच्या वतीने तालुकास्तरावर चोरट्या मार्गान होणारी वाळूची वाहतूक रोखण्यासाठी पथके नेमण्यात आली आहे. असे असले तरी वर्षभरात अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीच्या केवळ १५५ कारवाया करण्यात आल्या. यातून तीन कोटी ७७ लाख ५६ हजारांचा दंड ठोठावण्यात आला होता. त्यातील केवळ १ कोटी ८५ लाख ८४ हजार रुपये दंड वसूल झाला आहे, तर वैध अवैधरीत्या महसूल विभागाने नऊ महिन्यांत ३ हजार ३५ चालान देण्यात आल्या. यातून शासनाला २७ कोटी ६८ लाख ८३ हजार ३२९ हजारांचा महसूल गोळा झाला आहे. मुळात जिल्ह्यात वाळूतस्करीचा सुरू असलेला गोरखधंदा पाहता महसूल प्रशासनाची कारवाई म्हणजे वरातीमागून घोडे असल्याचे दिसून येत आहे. 

ठिकठिकाणी अवैध उत्खननही आहे जोरात मुरुमाचे अवैध उत्खनन मोठ्या प्रमाणात होते. काही ठिकाणी वीटभट्टीसाठी मातीचे उत्खनन केले जाते. हा सर्व गैरप्रकार नियमित करण्याचे मोठे आव्हान आहे. यात शासनाचा महसूल बुडतो. दुसरीकडे पर्यावरणाचीही प्रचंड हानी होत आहे. मात्र, खनिकर्म विभागाकडून याकडे डोळेझाक केली जात असल्याचे बोलले जात आहे. ५५ कोटी चे जिल्हा महसूल विभागाला शासनाने उद्दीष्ट दिले आहे. यापैकी ५० टक्के वसुली झाली. पुढील तीन महिन्यात ५० टक्के वसुली करण्याचे आव्हान आहे.

डेपो महसूल झाला कमी जिल्ह्यातील पाच तालुक्यांत एकूण आठ डेपो आहे. शासनाने गतवर्षी वाळू धोरणात बदल डेपोची संकल्पना सुरू केली. वाहतुकीचा भार महसूल विभागावरच पडल्याने महसुलात घटला.

बांधकाम' कडे कोट्यवधींची रॉयल्टी शासनाने खनिकर्म विभागाला दिलेल्या गौण खनिज वसुली उद्दिष्टामध्ये रॉयल्टी रकमेचाही मोठा वाटा असतो. सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम, पाटबंधारे, जलसंधारण, नगरपरिषद, नगरपंचायत, पंचायत समिती, ग्रामपंचायत आदी विभागांमार्फत केल्या जाणाऱ्या विविध विकासकामांवरील गौण खनिजाची रॉयल्टी संबंधित विभागाने खनिकर्म विभागाकडे जमा करणे गरजेचे आहे. ही वसुलीदेखील थकीत असल्याचे सांगण्यात आले आहे. खनिकर्म विभागाकडून याबाबतचा आढावा घेण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू असल्याची माहिती आहे.

जिल्ह्यातील या अधिकाऱ्यांनी केल्या कारवायाअधिकारी                          कारवाई संख्या              वसूल खनिकर्म अधिकारी                  ४७६                    १७८७६६३८८ तहसीलदार वर्धा                      १९०                       १८३१८९६० तहसीलदार हिंगणघाट              ३८८                      १४९३६८०९ तहसीलदार आष्टी                     ३३४                      ११४५६६६४ तहसीलदार समुद्रपूर                 ३६२                      ११३०४५०४ तहसीलदार देवळी                    २४९                      ७४८७०९३ तहसीलदार आर्वी                      ३०१                       ६३१६३७८ एसडीओ हिंगणघाट                    ४१                        ३८१६५०० तहसीलदार कारंजा                    १९०                       २४६६७८६ एसडीओ वर्धा                            ०५                         ६१८७३६ करमणूक अधिकारी वर्धा           ०१                          १८०००० एसडीओ पथक                         ०१                          ५२३

टॅग्स :wardha-acवर्धाTaxकर