शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पोहण्याचा नाद बेतला जिवावर; नववीचे शिक्षण घेणाऱ्या दोघांचा बुडून अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2022 05:00 IST

खेळायला जातो, असे सांगून घराबाहेर पडलेले, रात्री उशीर होऊनही घरी न परतल्याने कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला. पण ते न मिळाल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांकडूनही मुलांचा शोध घेतला जात असतानाच रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास शहापूर शिवारात शेतात काम करीत असलेले मजूर विहिरीवर पाणी पिण्यासाठी गेले असता त्यांना विहिरीत मृतदेह असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी/देऊरवाडा : ‘मी खेळायला जातोय’ असे सांगून घराबाहेर पडलेल्या दोन युवकांनी थेट शेतातील विहीर गाठली. याच विहिरीत पोहण्यासाठी उतरलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना रविवारी सकाळी नजीकच्या शहापूर शिवारात उघडकीस आली असून देवांशू नीलेश घोडमारे (१४) रा. आसोलेनगर व युगंधर धर्मपाल मानकर (१५) रा. साईनगर अशी मृत युवकांची नावे असून, हे दोघेही तपस्या इंग्लिश स्कूलमध्ये नववीचे शिक्षण घेत होते.खेळायला जातो, असे सांगून घराबाहेर पडलेले, रात्री उशीर होऊनही घरी न परतल्याने कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला. पण ते न मिळाल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांकडूनही मुलांचा शोध घेतला जात असतानाच रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास शहापूर शिवारात शेतात काम करीत असलेले मजूर विहिरीवर पाणी पिण्यासाठी गेले असता त्यांना विहिरीत मृतदेह असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून परिसरातील नागरिकांच्या मदतीने मृतदेह विहिरीबाहेर काढून मृतांची ओळख पटविली. तेव्हा ते दोघेही तपस्या इंग्लिश स्कूलमधील नववीचे विद्यार्थी असल्याचे पुढे आले. मृतकांची ओळख पटल्यावर पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. या प्रकरणी आर्वी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.

बंद मोबाईल ठरला शोध घेण्यात अडथळा-    देवांशू हा शनिवारी दुपारी ५ वाजता क्रीडा संकुलाच्या मैदानावर खेळाला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला होता. रात्री ८ वाजले पण तो घरी न परतल्याने व शोध घेऊन त्याची माहिती न मिळाल्याने देवांशूच्या कुटुंबीयांनी आर्वी पोलीस स्टेशन गाठले. अल्पवयीन मुलगा बेपत्ता असल्याची माहिती मिळताच पोलिसांनीही आपल्या हालचालींना गती देत देवांशू जवळील मोबाईलच्या आधारे त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. पण मोबाईलच बंद येत असल्याने व अखेरचे लोकेशन मोहन रेस्टॉरन्ट येत असल्याने पोलीसही हतबल झाले होते. अशातच रविवारी सकाळी देवांशूचा मृतदेह विहिरीत सापडला.

अशी उघडकीस आली घटना-    रविवारी माटोडा-बेनोडा मार्गावरील मौजा शहापूर शिवारातील राजेश गुल्हाणे यांच्या शेतात काम करीत असलेले मजूर पाणी पिण्यासाठी विहिरीवर गेले. त्यांनी विहिरीत डोकावून पाहले असता त्यांना एका युवकाचा मृतदेह निदर्शनास आला. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनीही घटनास्थळ गाठून विहिरीच्या पाण्यात तरंगत असलेला एक तर गाळात अडकलेला दुसरा, असे एकूण दोन्ही मृतदेह विहिरीबाहेर काढले. तसेच मृतांची ओळख पटविली. शिवाय पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आर्वीच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. 

देवांशूची आई अंगणवाडी पर्यवेक्षिका, तर युगंधरचे आईवडील शिक्षक

-    देवांशू घोडमारे याची आई अंगणवाडी पर्यवेक्षिका, तर वडील शेतकरी आहेत. शाळेतील हुशार विद्यार्थी असलेला देवांशू आपल्याला तर डॉक्टरच व्हायचे आहे, असे तो नेहमीच अनेकांना सांगायचा. पण या घटनेमुळे घोडमारे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगरच कोसळला आहे.-    युगंधर मानकर याचे आईवडील शिक्षक आहेत. युगंधरचे वडील इगतपुरी येथे विपशना प्रशिक्षण केंद्रात गेले होते. त्यांना ही दुःखद माहिती भ्रमणध्वनीवरून देण्यात आली.

कुटुंबीयांना न सांगताच जायचे शेतातील विहिरीवर पोहायला-    कुटुंबीयांना कुठलीही माहिती न देता ही दोन्ही मुलं मागील काही दिवसांपासून गुल्हाणे यांच्या शेतातील विहिरीत पोहायला जात होती. पण शनिवारी पोहण्यासाठी दोराच्या साह्याने विहिरीत उतरलेल्या या दोन्ही मुलांवर काळाने झडपच घेतली. या दोन्ही मुलांच्या मृत्यूमुळे आर्वी शहरासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपास आर्वीचे ठाणेदार भानुदास पिदूरकर करीत आहेत.

 

टॅग्स :SwimmingपोहणेDeathमृत्यू