शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

शेतकऱ्यांच्या आयुष्यात नुकसानाचे व्रण कायम! १०० गावांतील तेरा हजार शेतकरी बाधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 18:01 IST

Wardha : ऑक्टोबरच्या पावसात ८,६३४ हेक्टरवरील पीक बाधित

चेतन बेले लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्ह्यात पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानाच्या जखमा कमी होत नाही तोच पुन्हा परतीच्या पावसाने ऑक्टोबर महिन्यात नुकसान केले होते. यात तब्बल १२ हजार ९७० शेतकऱ्यांच्या ८,६३३.९९ हेक्टरवरील पिकांना फटका बसला होता. नुकसानभरपाईसाठी शासनदरबारी जिल्हा प्रशासनाने प्रस्ताव सादर केला; मात्र अद्याप निधी प्राप्त न झाल्याने शेतकऱ्यांच्या नुकसानीचे व्रण कायम आहेत.

पावसाळ्याचा पहिला महिना कोरडा गेला. नंतर झालेल्या पावसाने दाणादाण उडविली. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या महिन्यात अनेक तालुक्यात अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये झालेल्या नुकसानीचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला.

त्याचे वितरण सुरू आहे. मात्र, ऑक्टोबर महिन्यात झालेल्या नुकसानीची अद्याप भरपाई मिळालेली नाही. ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीमुळे देवळी, आर्वी तालुक्यांला फटका बसला. या दोन तालुक्यांतील १०० गावांतील १२, ९७० शेतकऱ्यांचे ८,६३३.९९ हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. 

३२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ३० कोटी रूपये झाले जमाअतिवृष्टीमुळे जिल्ह्यात २७,१३१.८० हेक्टरवर नुकसान झाले होते. त्यासाठी ३६ कोटी २१ लाख ७६ हजार ६७० रुपयांचा प्रस्ताव सरकार कडे पाठवला व शेतकाऱ्याच्या खतात ३० कोटी २० लाख ५२ हजारांचा निधी जमा झाला.

११.७६ कोटींचा प्रस्ताव शासनदरबारी धूळ खात ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे नुकसान झाले होते. या अतिवृष्टीत १०० गावांतील ८ हजार ६३३.१९ हेक्टरवरील पिके बाधित झाली होती. नुकसानापोटी शासनाकडे जिल्हा प्रशासनाकडून ११ कोटी ७६ लाख रुपयांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मात्र, अद्याप राज्य शासनाकडून जिल्हा प्रशासनाला निधी प्राप्त झाला नसल्याचे आपत्ती विभागाकडून सांगण्यात आले आहे.

"जुलै-सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानभरपाई निधी प्राप्त झाला असून, शेतकऱ्यांच्या खात्यावर वळती करण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांची केवायसी केली नसेल त्यांनी केवायसी करून घ्यावी. ऑक्टोबर महिन्यातील नुकसानाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. निधी प्राप्त होताच त्याचे वितरण केले जाणार आहे." - शुभम घोरपडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, वर्धा

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेतीFarmerशेतकरीwardha-acवर्धा