शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

'चंद्रयान' मोहिमेत हिंगणघाटच्या 'या' कन्येचाही सहभाग; इस्रोत शास्त्रज्ञ एसडी म्हणून देतेय सेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2023 12:51 IST

हिंगणघाटच्या या लेकीचं सर्व स्तरांतून कौतुक होत आहे

हिंगणघाट (वर्धा) : चंद्राच्या दिशेनं झेपावलेलं भारताचं चंद्रयान-३ चंद्रावर यशस्वीरित्या उतरले आणि संपूर्ण देशाने जल्लोष केला. अनेक ठिकाणी फटाके, आतषबाजी करून आनंद साजरा करण्यात आला. या ऐतिहासिक मोहिमेत हिंगणघाटच्या कन्येचाही मोलाचा वाटा आहे. हिंगणघाट येथील कोमल करवा (लोहिया) हिची चंद्रयान मोहिमेतील भूमिका महत्त्वाची ठरली असून, तिने अभियंता म्हणून जबाबदारी बजावली आहे. सध्या ती इस्रोत शास्त्रज्ञ एस. डी. या पदावर कार्यरत आहे.

चंद्रयान-३ कडून मिळणारी छायाचित्रे आणि रोवर सेंसरच्या साहाय्याने उपलब्ध होणाऱ्या माहितीच्या आधारे संशोधन करण्याची जबाबदारी इस्रोच्या ज्या चमूची आहे, त्यात कोमलचा सहभाग आहे. चांद्रयानाच्या यशस्वी लँडिंग नंतरचा हा महत्त्वाचा टप्पा आहे.

कोमल ही हिंगणघाट येथील व्यापारी नंदकिशोर करवा यांची कन्या आहे. बालपणीच पितृछत्र हरपलेल्या या मुलीचा सांभाळ आईने केला. कोमलच्या शिक्षणासाठी या मायमाउलीने प्रचंड परिश्रम घेतले. कोमल हिला उत्तम शिक्षण मिळावे यासाठी तिचे काका नारायण करवा व ब्रिजमोहन करवा तसेच भाऊ गणेश करवा यांचेही योगदान महत्त्वाचे ठरले.

इस्रोत २०१७ मध्ये झाली रुजू

कोमल हिने जी. बी. एम. एम. विद्यालयातून बारावी उत्तीर्ण केली. त्यावेळी तिने गुणवत्ता यादीत येण्याचा बहुमान पटकाविला होता. त्यानंतर तिने गुरू गोविंदसिंग कॉलेज, नांदेड या शासकीय महाविद्यालयातून बी. ई.ची पदवी घेतली. त्यानंतर एन. आय. टी., अलाहाबाद येथे एम. टेक. पूर्ण केले. तिने चमकदार कामगिरी करून सुवर्णपदकाचीही कमाई केली होती. त्यानंतर २०१७ मध्ये तिची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) येथे अभियंता म्हणून निवड झाली. तिने परीक्षेत संपूर्ण देशातून अकरावा रँक मिळविला होता. सध्या ती इस्रोमध्ये ‘शास्त्रज्ञ एस. डी.’ या पदावर कार्यरत आहे.

चांद्रयान -२ मध्येही होता सहभाग

उच्चशिक्षणात सुवर्ण पदकासह ती बंगळुरू येथे भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) येथे अभियंता म्हणून रुजू झाली. येथे रुजू होताच चांद्रयान -२ मोहिमेतही तिने आपले योगदान दिले होते. यानंतर चांद्रयान-३ मध्येही तिचा सक्रिय सहभाग आहे. आता तर नंतरच्या संशोधनाची जबाबदारी तिच्या चमूवर आहे.

टॅग्स :SocialसामाजिकChandrayaan-3चंद्रयान-3isroइस्रोscienceविज्ञानwardha-acवर्धा