शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

प्रचार वाहनांसह साहित्यांचेही दरपत्रक ठरले, नियमात राहूनच करावी लागणार तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 17:39 IST

खर्चाची मर्यादा पाळणे अनिवार्य : निवडणूक विभागाने निश्चित केले वाहनांचे दर

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचार करणे आवश्यक आहे. प्रचारासाठी प्रामुख्याने विविध प्रकारच्या वाहनांचा उपयोग केला जातो. कोणत्या वाहनाचे दर दिवसाला किती रुपये भाडे राहील, हे निवडणूक विभागाने निश्चित केले आहे. त्यानुसार टाटा सुमो, बोलेरो, काळी-पिवळी, जीप यांचे इंधनासह प्रति दिवसाचे भाडे ३ हजार ८०० रुपये तर बैलगाडी, घोडगाडी प्रतितास २ रुपये दर ठरविण्यात आले आहे. त्यामुळे निवडणूक विभाग याकडे लक्ष ठेवणार असून त्यानुसार उमेदवारांचा खर्च निश्चित केला जाणार आहे.

निवडणुकीदरम्यान मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवाराला प्रचार करावा लागतो. यासाठी वाहने भाड्याने घेऊन त्यावर ध्वनिक्षेपक लावला जाते. तसेच बॅनर, पोस्टर व वाहनाला बॅनर, पोस्टर बांधून उमेदवार प्रचार करतात. निवडणुकीदरम्यान खर्चाची मर्यादा पाळणे उमेदवाराला आवश्यक आहे. यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीत ४० लाख रुपयांची मर्यादा देण्यात आली आहे. दर दिवशीचा खर्च उमेदवाराला निवडणूक विभागाकडे सादर करावा लागतो. खर्चाची मर्यादा ओलांडल्यास तो उमेदवार निवडून येऊनही त्याचे पद धोक्यात येण्याची शक्यता असते. कोणत्या वाहनासाठी किती रुपये दर राहणार आहे, हे ठरविण्याचा अधिकार निवडणूक विभागाला आहे. संबंधित उमेदवाराने त्या वाहनधारकाला कितीही रुपये दिले तरी निवडणूक विभागाकडे खर्च सादर करतेवेळी निवडणूक विभागाने ठरवून दिलेल्या दरानेच खर्च सादर करायचा असतो. निवडणूक खर्चाचा हिशेब जुळवताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी निवडणूक विभागाने जवळपास सर्वच प्रकारच्या वाहनांचे दर ठरवले आहेत. सोबतच इंधनासह व इंधनाशिवाय असेसुद्धा वर्गीकरण केले आहे. त्यानुसार निवडणूक खर्च विभागाला सादर करणे आवश्यक आहे. 

सायकल रिक्षा प्रतितास दोन रुपयांत कुठे मिळते सााहेब? काही उमेदवार शहरात सायकल रिक्षाच्या माध्यमातून प्रचार करतात. त्यासाठी इंधन लागत नसल्याने त्याचे भाडे कमीच ठेवण्यात आले आहे. निवडणूक विभागाने सायकल रिक्षा, घोडागाडी, बैलगाडी, सायकल यासाठी प्रतितास केवळ २ रुपये भाडे ठरविले आहे. ४०० रुपये दिवसाची मजुरी दिल्याशिवाय मजूर मिळत नाही. अशा स्थितीत सायकल, सायकल रिक्षा, बैलगाडी केवळ दोन रुपये प्रतितास या दराने मिळणार काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

४० सिटर प्रवासी वाहनाचे भाडे दहा हजार रुपये४० सिटर प्रवासी वाहनाचे इंध- नाशिवाय दिवसाचे भाडे ७ हजार ७०० रुपये तर इंधनासह १० हजार ४०० रुपये ठरविण्यात आले आहे. १८ सिटर वाहनासाठी दिवसाचे इंधनाशिवाय भाडे ४ हजार ६२५ रुपये तर इंधनासोबत भाडे ५ हजार ७६० रुपये ठरविले आहे. ५० सिटर वाहनाचे इंधनासोबतचे भाडे १२ हजार १५० रुपये ठरविण्यात आले आहेत. 

ऑटोरिक्षा एक हजार रुपये दिवस ऑटोरिक्षाच्या माध्यमातूनही प्रचार केला जातो. निवडणूक विभागाने इंधनासह ऑटोरिक्षाचा दर प्रतिदिवस एक हजार रुपये, सायकल रिक्षा प्रतितास २ रुपये, दुचाकी प्रतितास २० रुपये ट्रॉलीसोबत ट्रॅक्टर प्रतिदिवस ३ हजार रुपये दर ठरविला आहे.

मालवाहू वाहनासाठी पाच हजार रुपये मालवाहू हलक्या वाहनाचे इंधनासह भाडे ५ हजार २६० रुपये ठरविले आहे. १० चाकी वाहन असल्यास १२ हजार ८०० रुपये, १२ ते १४ चाकी वाहन १३ हजार ६०० रुपये, १६ चाकी वाहनाचे भाडे १५ हजार ७०० रुपये ठरविले आहेत. त्यानुसार निवडणूक खर्च सादर करावा लागेल.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४wardha-acवर्धा