शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील राजकारणामध्ये महिलांचा टक्का अद्याप कमीच !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 18:28 IST

आतापर्यंत दोनच महिलांना संधी : यंदाच्या निवडणुकीत सहा महिला रिंगणात

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्ह्याच्या राजकारणात महिलांचा टक्का प्रारंभापासूनच कमीच असल्याचे चित्र असून विधानसभा निवडणूकही त्यास अपवाद नाही. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर जिल्ह्याचा एकंदरित विचार केल्यास केवळ दोनच महिलांना देवळी विधानसभा क्षेत्रातून विधिमंडळात जाण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील महिलांचा राज्याच्या राजकारणात तसा टक्का फारच कमी आहे.

आजपर्यंत देवळी विधानसभा मतदारसंघातून दोन महिलांनी विधिमंडळ गाठले होते. यामध्ये पहिल्यांदा स्व. प्रभा राव आणि दुसऱ्यांदा सरोज काशिकर यांचा समावेश होता. मात्र, त्यानंतर जिल्ह्यातील लोकसभाच नव्हे तर, विधानसभेत महिला पोहोचल्याच नाहीत. म्हणजेच दोनच महिलांना संधी मिळाली आहे.

महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर केवळ दोनच महिलांना मिळालेली संधी पाहता महिलांचा जिल्ह्याच्या राजकारणातील टक्का तुलनेने कमीच आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचा टक्का मोठा आहे. मात्र, तो तिथपर्यंत मर्यादित राहिला आहे. त्याची व्याप्ती विधिमंडळ किंवा संसदेपर्यंत पोहोचलीच नसल्याचे जिल्ह्याचे आजपर्यंतचे चित्र आहे. यंदाही फक्त सहाच महिला रिंगणात आहेत. 

जिल्ह्याच्या लोकसंख्येत मागील पाच वर्षात वाढ झाली आहे. पुरुषांबरोबरच महिलां मतदारांची संख्याही निर्णायक असते. त्यामुळे निवडणुकांमध्ये महिलांनाही संधी दिल्यास त्या देखील जिल्ह्याचे नेतृत्व करु शकेल. 

गेल्या निवडणुकीत एकच महिला रिंगणात

  • २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील चारही मतदारसंघातून फक्त एकाच महिलेने भाग्य आजमावले होते. हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातून मंदा रमेश ठावरे या अपक्ष उमेदवार होत्या. 
  • विशेष म्हणजे, अन्य तीन विधानसभा मत- दारसंघातून महिला रिंगणात उतरल्याच नव्हत्या. महिलांना विधानसभेची तिकीट दिली जात नसल्याचेही आताच्या राजकार- णातून दिसून येत आहे. 

यंदा सहा महिला निवडणुकीसाठी इच्छुक यंदाच्या निवडणुकीमध्ये सात महिला निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. यामध्ये आर्वी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून मयुरा काळे, हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातून बहुजन मुक्ती पार्टीच्या वर्षा कन्नाके, मंगला ठक अपक्ष, देवळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाकडून अश्विनी शिरपू- रकर, माधुरी डाहारे अपक्ष तर वर्धा विधानसभा मतदारसंघातून स्मिता नगराळे अपक्ष अशा सहा महिला उमेदवार रिंगणात आहे.

मतदानाचा टक्का होता जास्त २०१९ च्या निवडणुकीत महिलांचा मतदानाचा टक्का पुरुषांच्या तुलनेत कमी दिसून आला. त्यावेळी ५,५३,१३३ महिला मतदारांनी मतदान केले होते. टक्केवारी बघितल्यास ६० महिलांनी मतदान केले होते. त्यामुळे यंदाही महिलांच्या मतदानाचा टक्का वाढविण्याचीही गरज यानिमित्ताने निर्माण झाली आहे.

 

टॅग्स :wardha-acवर्धाPoliticsराजकारणmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४