शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' अल्पवयीन मुलीच्या हत्येचा उलगडा; आरोपीस ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2022 16:03 IST

सकाळी मुलीची आई कामावर जाताना मुलगी घरीच होती. तर दुपारी ५ वाजताच्या सुमारास मुलीची आई घरी परतल्यावर ती घरी दिसून आली नाही.

ठळक मुद्देअल्पवयीन मुलीचा नग्न अवस्थेत सापडला होता मृतदेह

 वर्धा : पवनार येथील रहिवासी असलेल्या एका १४ वर्षीय मुलीचा बुधवारी सायंकाळच्या सुमारास पवनार शिवारातीच धाम नदीच्या शेजारी असलेल्या किल्ल्याच्या मागील भागात नग्न अवस्थेत मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. ही अल्पवयीन मुलगी शनिवारपासून घरून बेपत्ता होती. तशी तक्रार मुलीच्या आईने सेवाग्राम पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला असून, या मुलीची गावातीलच ३० वर्षीय तरुणाने गळा आवळून हत्या केल्याचे पुढे आले आहे.

शनिवारी सकाळी मुलीची आई कामावर जाताना मुलगी घरीच होती. तर दुपारी ५ वाजताच्या सुमारास मुलीची आई घरी परतल्यावर ती घरी दिसून आली नाही; पण याच दिवशी हनुमान जयंतीचा गावात कार्यक्रम असल्याने आपली मुलगी तेथे गेली असावी, असा अंदाज मुलीच्या आईने लावत ती रात्रीला झोपी गेली. दुसऱ्या दिवशी सूर्यादय होऊनही मुलगी घरी न परतल्याने मुलीच्या आईने शोधाशोध सुरू केली.

दरम्यान, मुलीच्या आईने गावातीलच सतीश जोगे याला मुलीचा शोध घेण्यासाठी विनंती केली. त्यानंतर पवनार येथील सैय्यद अहमद कबीर बाबाचे दर्गाहच्या मागील धाम नदीच्या गंगाडोहजवळ नदीशेजारी मुलीचे कपडे असल्याची माहिती मुलीच्या आईला फोनवरून दिली. तर बुधवारी या १४ वर्षीय मुलीचा मृतदेह धाम नदीच्या शेजारी असलेल्या किल्ल्याच्या मागील भागात नग्न अवस्थेत सापडला. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप, सेवाग्रामचे ठाणेदार नीलेश ब्राह्मणे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठले. घटनास्थळी ठसे तज्ज्ञांच्या चमूला पाचारण करण्यात आले होते.

पाच तासांनंतर सतीशने दिली कबुली

मुलीच्या आईची तक्रार प्राप्त झाल्यावर पोलिसांनी आपल्या तपासाला गती देत गोपनीय पद्धतीने अधिकची माहिती घेतली. दरम्यान, सेवाग्राम पोलिसांनी चौकशीसाठी पवनार येथील सतीश जोगे याला ताब्यात घेतले. सुरुवातीला उडवाउडवीचे उत्तरे देणारा सतीश तब्बल पाच तासांनंतर बोलता झाला. शिवाय त्याने आपणच या अल्पवयीन मुलीची गळा आवळून हत्या केल्याचा तसेच मृतदेह धाम नदीशेजारील बेशरमात फेकल्याची कबुली पोलिसांना दिली. त्यानंतर सेवाग्राम पोलिसांनी पवनार गाठून मृतदेह ताब्यात घेतला. संबंधित अल्पवयीन मुलगी सेलू येथील यशवंत विद्यालयात नववीचे शिक्षण घेत होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू