लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम (वर्धा) : राहुल गांधी यांनी मतचोरी प्रकरणात निवडणूक आयोगाला ठोस पुरावे सादर केले आहेत. आणखी किती पुरावे द्यायचे? तरीही आयोग झोपेतून जागा होण्यास तयार नाही. निवडणूक आयोगाचा कारभार 'दस नंबरी' झाला आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुधवारी सेवाग्राम येथे केला.
हर्षवर्धन सपकाळ यांनी बुधवारी सकाळी सेवाग्राम येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या आश्रमास भेट दिली. यावेळी उपस्थित पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, ज्याचे नाव जितक्या वेळा मतदार यादीत आहे, तितक्या वेळा निवडणूक आयोगाने त्या नावासमोर 'स्टार' लावावेत. आम्ही इतका मोठा दस्तऐवज आयोगासमोर ठेवला, तरी ते पुरावेच मागत आहेत. पुरावे दिल्यानंतरही प्रतिक्रिया द्यायला तयार नाहीत.
शेतकरी प्रश्नासंदर्भात बोलताना ते म्हणाले, सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली. पॅकेज जाहीर केले; पण त्यात किती गळती आहे, हे बघितले नाही. शेतकऱ्यांकरिता प्रहारचे बच्चू कडू यांनी मोठे आंदोलन केले. त्यांना शासनाने दिलेले आश्वासन फोल ठरू नये. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी इतकीच अपेक्षा आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांचा निर्णय स्थानिक नेत्यांकडे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबतच्या आघाडीबद्दल विचारले असता सपकाळ म्हणाले की, त्यांनी अद्याप काँग्रेसकडे कोणत्याही प्रकारचा आघाडीचा प्रस्ताव दिलेला नाही. त्यामुळे आघाडीचा प्रश्नच येत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या २ निवडणुकीसंदर्भात निर्णय घेण्याची मुभा स्थानिक नेत्यांनाच देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Web Summary : Harshvardhan Sapkal accuses Election Commission of corruption, citing Rahul Gandhi's evidence of voter fraud. He criticizes the commission's inaction and demands transparency. He also mentioned farmer loan waiver.
Web Summary : हर्षवर्धन सपकाल ने राहुल गांधी के मतदाता धोखाधड़ी के सबूतों का हवाला देते हुए चुनाव आयोग पर भ्रष्टाचार का आरोप लगाया। उन्होंने आयोग की निष्क्रियता की आलोचना की और पारदर्शिता की मांग की। उन्होंने किसान ऋण माफी का भी उल्लेख किया।