शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

मद्यपींचा हिरमोड अन् काही पोलीस कर्मचाऱ्यांचे ‘बल्ले-बल्ले’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2022 22:06 IST

वर्धा हा दारूबंदीचा जिल्हा असतानाही याच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारूची विक्री होत होती. शहरासह जिल्ह्यातील गल्लीबोळांमध्ये देशी-विदेशींचे घोट रिचविले जात होते. शहरासह ग्रामीण भागात गावठी दारूभट्ट्यांनी आपले जाळे पसरविले होते. मात्र, पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी कार्यभार स्वीकारताच दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरासह जिल्ह्यात दारूबंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचा ध्यास पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी घेतला आहे. शहरासह जिल्ह्यातील दारूविक्रेते ‘अंडरग्राउंड’ झाले असून दारू मिळणे कठीण झाल्याने मद्यप्यांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. असे असतानाच जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यांतील काही कर्मचारी बाहेरगावाहून, तर काही कर्मचाऱ्यांना गावातच अगदी सहजरीत्या दारू उपलब्ध होत असल्याने त्यांची ‘बल्ले बल्ले’ सुरू आहे. अशा काही मद्यपी कर्मचाऱ्यांवरही लगाम लावणे गरजेचे आहे. वर्धा हा दारूबंदीचा जिल्हा असतानाही याच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारूची विक्री होत होती. शहरासह जिल्ह्यातील गल्लीबोळांमध्ये देशी-विदेशींचे घोट रिचविले जात होते. शहरासह ग्रामीण भागात गावठी दारूभट्ट्यांनी आपले जाळे पसरविले होते. मात्र, पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी कार्यभार स्वीकारताच दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले. अवघ्या १६ ते १७ दिवसांतच त्यांच्या मार्गदर्शनात लाखोंचा देशी-विदेशी दारूसाठा जप्त करून गावठी दारूभट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या. शहरातील दारूविक्रेत्यांनी शहरातून पलायन केले. यामुळे मद्यप्यांना दारू मिळणे कठीण झाले.जिल्ह्यात दारूची प्रभावी अंमलबजावणी सुरू असतानाच जिल्ह्यातील काही पोलीस कर्मचाऱ्यांना मात्र सहजरीत्या दारू उपलब्ध होत असल्याचे चित्र आहे. काही कर्मचाऱ्यांना हॉटेलात, काहींना बाहेरगावाहून, तर काहींना गावातूनच दारू उपलब्ध होत असल्याने कर्तव्यावरदेखील ते मद्यधुंद अवस्थेत राहत असल्याचे चित्र आहे. हे वास्तव जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यांत आहे. यावर पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी लगाम लावणे गरजेचे आहे. 

‘साहेबां’नी ठाणेदारांना द्याव्यात सूचना...- जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यांतील पोलीस अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना देण्याची नितांत गरज आहे. शहरातील दारूविक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येतो आहे, तसा काही मद्यपी कर्मचाऱ्यांचाही शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी प्रत्येक पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना देण्याची गरज आहे; तरच पूर्णपणे दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी होईल, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

ठरावीक हॉटेलात विशेष सेवा- शहरालगत किंवा शहराबाहेरील काही ठरावीक ढाबे, हॉटेलांत काही पोलीस कर्मचाऱ्यांसाठी विशेष सोय उपलब्ध करून दिली जाते. ‘स्पेशल’ टेबल लावून कर्मचारी दारूचे घोट रिचवीत असल्याचे दिसून येत आहे. ही बाबही गंभीर आहे. शहरातील काही हाॅटेल्स तसेच शहरालगतच्या ढाब्यांवरही अशा कर्मचाऱ्यांची रात्रीच्या सुमारास मद्यपार्टी सुरू असते. हे विशेष !

 

टॅग्स :liquor banदारूबंदीPoliceपोलिस