शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसाठी काय केले ते केंद्र सरकारने सांगावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 17:33 IST

Vardha : खासदार काळे यांनी उपस्थित केला संसदेत प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : शेतकऱ्यांप्रती केंद्र सरकारचे मोठ्या प्रमाणात उदासीन धोरण आहे. आजही विदर्भात आत्महत्या होत आहेत. याला कारणीभूत कोण? २०१४ मध्ये यवतमाळ येथे शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते. दाभाडी येथे 'चाय पे चर्चा' करून शेतकऱ्यांना हमी भाव, स्वामीनाथन आयोग लागू करू, असे विविध आश्वासने दिली होती. मात्र, एकही आश्वासन पूर्ण केले नाही. केंद्र सरकारने पुन्हा दाभाडी येथे 'चाय पे चर्चा' कार्यक्रम घेत शेतकऱ्यांसाठी अकरा वर्षांत काय केले हे सांगावे? असा प्रश्न खासदार अमर काळे यांनी संसदेत उपस्थित केला.

कापसाला सात हजार रुपये भाव आहे, तर साडेचार हजार रुपये क्विंटल सोयाबीन विकले जात आहे. केंद्र सरकारने आश्वासन पाळले असते, तर शेतकऱ्यांच्या कापसाला १५ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव असता. पिकाला भाव मिळाला असता तर शेतकऱ्यांचे अर्धे प्रश्न असेच सुटले असते. मात्र, प्रश्न सुटत नसल्याने विदर्भात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढतीवर आहे. याकडे मोठ्या प्रमाणात केंद्र शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

विदर्भातील अमरावती, नागपूर आणि इतर पट्टयातून मोठ्या प्रमाणात बांगलादेश येथे सव्वा लाख मेट्रिक टन संत्रा जात होता. मात्र, या संत्र्यावर या पाच वर्षात १०१ टक्के ड्युटी लावल्याने शेतकऱ्यांच्या मोठ्या अडचणी वाढल्या आहेत. संत्र्याला भाव नाही, याकडे संसदेने लक्ष द्यावे, अशी मागणी खासदार अमर काळे यांनी केली आहे. यासोबतच संसद अधिवेशनात शेतकरी आत्महत्या, मोर्शी, वरुड येथील संत्रा उत्पादक यांच्या समस्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, आरोग्य सेवेत पार्ट टाइम सेविकांच्या मानधनात वाढ, घरकुल योजनेत मिळणाऱ्या रकमेत वाढ करावी, असे विविध प्रश्न मांडून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

'चाय पे चर्चा' करण्यासाठी आवाहनशेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी करणाऱ्यां केंद्र सरकारला आश्वासनांचा विसर पडला आहे. यवतमाळ दौऱ्यांचा उल्लेख करीत गत ११ वर्षात शेतकयांसाठी काय केले, यावर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने पुन्हा 'चाय पे चर्चा' करण्याचे थेट आवाहन खासदार काळे यांनी केले.

टॅग्स :Amar Kaleअमर काळेcongressकाँग्रेसwardha-acवर्धा