थावरचंद गेहलोत आज जिल्ह्यात

By Admin | Updated: August 20, 2016 01:50 IST2016-08-20T01:50:56+5:302016-08-20T01:50:56+5:30

केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकार मंत्री थावरचंद गेहलोत हे शनिवारी वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.

Thavarchand Gehlot in district today | थावरचंद गेहलोत आज जिल्ह्यात

थावरचंद गेहलोत आज जिल्ह्यात

वर्धा : केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकार मंत्री थावरचंद गेहलोत हे शनिवारी वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. सावंगी (मेघे) येथे त्यांच्या हस्ते दिव्यांगांना निशुल्क साहित्य वितरीत करण्यात येणार आहे.
ना. गहलोत शनिवारी सकाळी ७ वाजता नागपूर येथून सकाळी ८.३० वाजता पवनार आश्रमात येतील. सकाळी ९ वाजता पवनार येथून सेवाग्राम आश्रमात जातील. आश्रमात ते सुमारे दीड तास घालवतील. यांनतर पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅस मंत्रालयाच्या उज्ज्वला योजनेच्या कार्यक्रमाचा शुभारंभ व दिव्यांगांना त्यांच्या हस्ते निशुल्क साहित्य वितरण होईल. यानंतर देवळी पालिकेच्या सांस्कृतिक सभागृहाच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. येथून आर्वीकडे प्रयाण करतील. आर्वीतील कार्यक्रमानंतर आष्टीकडे प्रयाण करतील. आष्टीत सायंकाळी ५.३० वाजता आझादी ७० भारतीय आझादी आंदोलनच्या योजनेंतर्गत शहीद हुतात्मा स्मारकावर तिरंगा रॅली व क्रांती स्थळ येथील कार्यक्रमास उपस्थित राहतील. संध्याकाळी ७ वाजता आष्टी येथून नागपूरकडे रवाना होतील.(प्रतिनिधी)

Web Title: Thavarchand Gehlot in district today