जिल्ह्यातील १३० पोलिसांचे ठाणेपालट

By Admin | Updated: June 12, 2016 01:49 IST2016-06-12T01:49:25+5:302016-06-12T01:49:25+5:30

जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यानंतर जिल्हा अंतर्गत कर्मचाऱ्यांच्याही बदल्या झाल्या.

Thane Palat of 130 police stations in the district | जिल्ह्यातील १३० पोलिसांचे ठाणेपालट

जिल्ह्यातील १३० पोलिसांचे ठाणेपालट

दूरच्या कर्मचाऱ्यांना प्रथम संधी : विनंती बदल्या सोमवारी
वर्धा : जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यानंतर जिल्हा अंतर्गत कर्मचाऱ्यांच्याही बदल्या झाल्या. यात जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी १३० कर्मचाऱ्यांचे ठाणेपालट करण्यात आले. शिवाय जिल्ह्यात कर्मचाऱ्यांची कमी असलेल्या चार ठाण्यांना अतिरिक्त कर्मचाऱ्यांची कुमक देण्यात आली. झालेल्या बदल्यांपैकी ७५ टक्के बदल्या कर्मचाऱ्यांच्या इच्छेनुसार झाल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले आहे. विनंती बदल्या सोमवारी होणार आहेत

Web Title: Thane Palat of 130 police stations in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.