शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

चाचण्या 3 हजारांच्या, पावती देतात मात्र 2,800 रुपयांची!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 5:00 AM

राज्य शासनाने आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य केली आहे. याकरिता रुग्ण शासकीय रुग्णालयात चाचणी करण्यासाठी गर्दी करीत आहे. येथे केवळ १० रुपयांच्या पावतीवर आरटीपीसीआर, अ‍ॅन्टिजन चाचणी करण्यात येत असून, एक -दोन दिवसांत रिपोर्टही दिला जातो.  शासकीय रुग्णालयात चाचणीकरिता उसळणारी गर्दी आणि कोरोना संसर्गाचा संभाव्य धोका म्हणून अनेकांकडून खासगी पॅथॉलॉजी लॅबमध्ये चाचणी करून घेण्यास प्राधान्य दिले जात आहे.

ठळक मुद्देपॅथलॅब संचालकांचे लूटमार धोरण : अनेकांना पावती देण्यासही नकार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना संसर्गाचा कठीण काळ असताना शहरातील पॅथॉलॉजी लॅब संचालकांनी लूटमारीचे अजबच धोरण अवलंबिले आहे. तीन हजार रुपयांच्या चाचण्या केल्यानंतर पावती मात्र २,८०० रुपयांची दिली जात आहे. तर अनेकांनी मागणी केल्यानंतर पावती देण्यास नकार दिला जात आहे.राज्य शासनाने आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य केली आहे. याकरिता रुग्ण शासकीय रुग्णालयात चाचणी करण्यासाठी गर्दी करीत आहे. येथे केवळ १० रुपयांच्या पावतीवर आरटीपीसीआर, अ‍ॅन्टिजन चाचणी करण्यात येत असून, एक -दोन दिवसांत रिपोर्टही दिला जातो.  शासकीय रुग्णालयात चाचणीकरिता उसळणारी गर्दी आणि कोरोना संसर्गाचा संभाव्य धोका म्हणून अनेकांकडून खासगी पॅथॉलॉजी लॅबमध्ये चाचणी करून घेण्यास प्राधान्य दिले जात आहे. वर्धा शहरात तीन ते चार नामांकित कंपन्यांच्या फ्रॅन्चाइजी असलेल्या पॅथलॅब आहेत. ज्यांना फ्रॅन्चाइजी देण्यात आली,  त्या संचालकांकडे आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर नाही. लहानशा दुकान गाळ्यातूनच चाचणीचे काम केले जात आहे. या पॅथलॅब संचालकांकडून सर्वसामान्यांची अव्वाचे सवा शुल्क आकारणी करून सर्वसामान्यांची लूट केली जात आहे. एक हजार रुपयांची चाचणी केल्यानंतर पावती मात्र, ८०० रुपयांचीच दिली जात आहे.  घरी येऊन चाचणी करणाऱ्यांकडूनही मनमानी शुल्क आकारले जात आहे. इमर्जन्सी चाचण्या करावयाची असल्यास आणि रिपोर्ट तत्काळ हवे असल्यास अतिरिक्त पैसे घेतले जात आहे. तर काही रुग्णांना पावती देण्यास लॅब संचालकांकडून नकार दिला जात आहे. संबंधित तीन-चारही पॅथलॅबच्या दरातही प्रचंड तफावत आहे. मात्र, या पॅथॉलॉजी लॅब संचालकांवर जिल्ह्याच्या आरोग्य विभागाचे नियंत्रण नाही. नियंत्रणाची जबाबदारी  असलेले जिल्हा शल्य चिकित्सक मौन धारण करून आहे, तर जिल्हा आरोग्य अधिकारी यासंदर्भात भाष्य करण्यास टाळत आहेत. त्यामुळे लूटमारीचा हा बेकायदेशीर धंदा आणखीच तेजीत आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आता न्यायालयातच धाव घेण्याचा मानस मंगळवारी ‘लोकमत’कडे बोलून दाखविला.

चाचण्यांचे दर ‘युनिफॉर्म’ असावेतकोविड चाचणीसह विविध चाचण्या केल्या जाणाऱ्या पॅथलॅबच्या दरात प्रचंड तफावत आहे. मेडिसिस नामक पॅथलॅबमध्ये आरटीपीसीआरकरिता १२०० रुपये आकारले जात असून, थायरोकेअरकडून १००० ते १२०० आणि एनआरपीएल लॅबकडून ७८० रुपये आकारले जात आहेत. याशिवाय इमर्जन्सी, घरी येऊन चाचणी आदींचे दरही वेगवेगळे आहेत. शासनाने ठरवून दिलेले दर लॅब संचालकांकडून आकारले जात नसून, सर्वसामान्यांची अव्याहत लूट केली जात आहे.

पहिल्या लाटेत केली रग्गड कमाईकोरोना संसर्गाने मागील वर्षापासून राज्यासह जिल्ह्यात थैमान घातले आहे. या काळात अनेकांनी फ्रॅन्चाइजी असलेल्या पॅथॉलॉजी लॅबमध्ये आरटीपीसीआर चाचणी केली असता चक्क २२०० ते २५०० रुपये उकळण्यात आले. कोरोनाच्या या पहिल्या महामारीच्या लाटेत, लॅब संचालकांनी रग्गड कमाई केली. 

दिवसाकाठी ५ ते ६ हजार वसुलीपॅथॉलॉजी लॅबचालकांनी चाचण्या करण्याकरिता डीएमएलटी डिप्लोमाधारक, सोबतच सबएजंटची नियुक्ती करण्यात आली आहे. रुग्णांच्या नातेवाइकाने संपर्क केल्यानंतर घरी चाचणी करण्यासाठी सबएजंट आणि डिप्लोमाधारकांनाच पाठविले जात आहे. चाचणीपोटी एक सबएजंट मनमानी शुल्क आकारत दिवसाकाठी ५ ते ६ हजार रुपयांची कमाई करीत आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल