जसापूर,बोंदरठाणा परिसरात वाघाची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 06:00 IST2019-10-27T06:00:00+5:302019-10-27T06:00:22+5:30
कारंजा (घा.) तालुक्यातील जसापूर, बोंदरठाणा, सावळी, किन्हाळा, एकार्जुन शेतशिवारात सध्या वाघाचा वावर आहे. इतकेच नव्हेतर जसापूर शेत शिवारात वाघाने श्वानाला ठार केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये वाघाबाबत कमालीची दहशत निर्माण झाली आहे. या भागातील शेतकरी व शेतमजूर शेतात जाण्यासाठी नकार देत असून शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.

जसापूर,बोंदरठाणा परिसरात वाघाची दहशत
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा (घा.) : आगरगाव येथील एका तरुणाला ठार केल्यानंतर जंगलाच्या दिशेने निघून गेलेल्या वाघाने पुन्हा शेतशिवाराकडे वाट धरल्याने जसापूर बोंदरठाणा भागातील ग्रामस्थांच्या अडचणीत भर पडली आहे. वाघाने श्वानाचा फडशा पाडल्याने या भागातील नागरिकांमध्ये वाघाबाबत कमालीची दहशत निर्माण झाली असून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वन्यप्राण्यांचा वेळीच बंदोबस्त करावा, अशी मागणी या भागातील नागरिकांची आहे.
कारंजा (घा.) तालुक्यातील जसापूर, बोंदरठाणा, सावळी, किन्हाळा, एकार्जुन शेतशिवारात सध्या वाघाचा वावर आहे. इतकेच नव्हेतर जसापूर शेत शिवारात वाघाने श्वानाला ठार केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये वाघाबाबत कमालीची दहशत निर्माण झाली आहे. या भागातील शेतकरी व शेतमजूर शेतात जाण्यासाठी नकार देत असून शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.
या भागातील अनेकांच्या शेतात सोयाबीनची कापणी करून पीक ढिग करून ठेवण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर अनेक शेतकºयांनी सोयाबीन पिकाची मळणी केलेली नाही. अशातच जिल्ह्यात असलेले ढगाळी वातावरण आणि शेत शिवारात वाघाचा वावर असल्याने हातचे पिकही जाण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे.
नागरिकांची समस्या लक्षात घेता वनविभागाने तातडीने वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी या भागातील नागरिकांसह शेतकºयांची रास्त आहे.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनीही केली पाहणी
शेत शिवारात वाघ असल्याची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाºयांसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून बारकाईने पाहणी केली. शिवाय काही परिसराचीही यावेळी पाहणी करण्यात आली. याप्रसंगी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत असलेल्या काही नागरिकांनी फटाके फोडून वन्यप्राण्यांना पळविण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येते.