शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
5
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
6
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
7
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
8
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
9
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
10
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
11
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
12
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
13
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
14
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
15
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
16
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
17
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
18
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
19
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
20
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा

आमगाव परिसरात वाघाची दहशत कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 23:48 IST

गत दोन महिन्यांपासून खरांगणा व हिंगणी वनपरिक्षेत्रात पाळीव प्राण्यांची शिकार व हल्ले करून दहशत निर्माण करणाऱ्या वाघाने अखेर एका युवकाच्या नरडीचा घोट घेतला. यामुळे गावांत दहशत निर्माण झाली आहे. या दहशतीमुळे गावातील गोपालन व्यवसाय संकटात सापडला आहे.

ठळक मुद्देशेतीची कामे प्रभावित : नरभक्षक वाघ युवराज, पिंकी की अन्य; वनविभागही अनभिज्ञ

लोकमत न्यूज नेटवर्कआकोली : गत दोन महिन्यांपासून खरांगणा व हिंगणी वनपरिक्षेत्रात पाळीव प्राण्यांची शिकार व हल्ले करून दहशत निर्माण करणाऱ्या वाघाने अखेर एका युवकाच्या नरडीचा घोट घेतला. यामुळे गावांत दहशत निर्माण झाली आहे. या दहशतीमुळे गावातील गोपालन व्यवसाय संकटात सापडला आहे. शिवाय ऐन शेतीच्या हंगामात मशागतीच्या वेळेवर नागरिकांची वाघाने घाबरगुंडी उडवून दिली.खरांगणा व हिंगणी वनपरिक्षेत्राला लागून बोर व्याघ्र प्रकल्प आहे. कॅटरिनाचे मोठे झालेले नऊ बछडे यासह युवराज व पिंकी या बहीण भावाची जोडी गत दोन महिन्यांपासून येथे मुक्काम ठोकून आहे.सुसूंद शिवारातील शेती ही मदना धरणाला लागून असल्याने पिंकी व युवराज यांनी या भागात आपले बस्तान ठोकले आहे. मात्र ही बहीण-भावाची जोडी आक्रमक नसल्याने मनुष्यावर हल्ला करीत नाही. हे अनेकदा स्पष्ट झाले आहे; पण शेवटी वाघ म्हटले की भीती आलीच. त्यामुळे खरीपाचा हंगाम तोंडावर आला असताना नागरिक निरूत्साहाने शेतात जातात. पण डोक्यावर भीतीची टांगती तलवार असते.आमगाव येथे चेतन दादाराव खोब्रागडे या युवकाचा बळी घेणाऱ्या वाघाची अद्याप ओळख पटली नसली तरी कॅटरिनाच्या वयात आलेला बछडा असल्याचे बोलले जाते. सध्या तो वाघ माळेगाव (ठेका) व आमगाव शिवारात लोकांना रोज दर्शन देत आहे. शेतातील कड्याळुची सवंगणी करणे आता गरजेचे असताना नागरिकांत भीती निर्माण झाल्याने कामे रखडली आहे. वनविभागाने सदर भागात गस्त वाढवून नागरिकांना धीर दिला तरच शेती कसता येईल, अन्यथा यंदाचा हंगामात जमीन पडिक राहण्याखी भीती निर्माण झाली आहे.या हल्ल्यामुळे लोकांना ‘बाजीराव’ ची आठवण आली. तो बाजारगाव नजीक रस्ता अपघातात मरण पावला. त्याच्या सुरस कथा आजही त्या भागात ऐकायला मिळतात. कापूस वेचत असणाऱ्या महिलेच्या बाजूच्या ओळीतून जातानाही महिलेला कधी भय वाटले नाही. शेतात बांधलेल्या बैजजोडी जवळून जाताना त्याने कधी बैलजोडीकडे ढुकूंणही पाहिले नाही.या भागात कॅटरिनाचे नऊ बछडे असून आता पुन्हा तिने पिल्लांना जन्म दिल्याची माहिती आहे. पण ती सवयीप्रमाणे महिना-दीड महिना पिल्लाना बाहेर काढत नाही, असे वनविभाग सांगत आहे.वाघांचा बंदोबस्त करा यासाठी आमगाव, माळेगाव (ठेका), रामपूर, साईल, येणीदोडका, मरकसूर, गरमसूर, उमरविहिरी येथील लोकांनी सभेचे आज आयोजन केले आहे.

टॅग्स :Tigerवाघ