निविदा मंजूर; पण कामांचा पत्ताच नाही

By Admin | Updated: December 9, 2015 02:31 IST2015-12-09T02:31:15+5:302015-12-09T02:31:15+5:30

शहराची तहाण भागविणाऱ्या कार नदी प्रकल्पात गेलेल्या गावांचे पुनर्वसन खैरी येथे करण्यात आले.

Tender sanctioned; But there is no address of work | निविदा मंजूर; पण कामांचा पत्ताच नाही

निविदा मंजूर; पण कामांचा पत्ताच नाही

खैरी पुनर्वसन : मूलभूत सुविधांचा अभाव
रूपेश मस्के कारंजा (घा.)
शहराची तहाण भागविणाऱ्या कार नदी प्रकल्पात गेलेल्या गावांचे पुनर्वसन खैरी येथे करण्यात आले. या खैरी पुनर्वसन वसाहतीतील रस्ते, नाली, ग्रामपंचायत भवन व पाण्याची टाकी बांधकामाच्या निवीदा तीन महिन्यांपूर्वी मंजूर झाले; पण अद्याप प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली नाही. ‘लोकमत’ने केलेल्या पाठपुराव्यामुळे कामे मंजूर झाली; पण आता कामे सुरू होत नसल्याने असंतोष पसरला आहे.
खैरी पुनर्वसन वसाहतीमधील रस्ते, नाली, ग्रा.पं. भवन व पाण्याच्या टाकी बांधकामासाठी तीन महिन्यांपूर्वी निवीदा काढण्यात आल्या. सदर निवीदा मंजूर झाल्या आहेत; पण अद्याप कामाला सुरूवात झाली नाही. कामाची संपूर्ण माहिती इस्टिमेटसह देऊनच काम सुरू करावे, अशी मागणी कारनदी प्रकल्पग्रस्त समितीने केली आहे. याबाबत कार नदी प्रकल्पाच्या उपविभागीय अभियंत्यांना निवेदन देण्यात आले आहे.
कार प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांचा लोकमतने पाठपुरावा केला. गत १५ वर्षांपासून खैरी पुनर्वसन येथील नागरिक १८ नागरी सुविधांपासून वंचित आहेत. येथील रस्ते, नाल्या, पाण्याची टाकी आदी समस्या अद्याप जैसे थे आहे. यासाठी प्रकरल्पग्रस्त समितीने काही दिवसांपूर्वी कारनदी प्रकल्प कार्यालयास कुलूपही ठोकले होते. हे आंदोलन सतत तीन दिवस करण्यात आले. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केले. या पाठपुराव्यामुळे येथील समस्या सोडविण्याच्या दृष्टीने प्रशासन जागे झाले. रस्ते, नाली, ग्रा.पं. भवन व पाण्याची टाकी या कामांच्या निवीदा काढण्यात आल्या; पण तीन महिन्यांपासून टेंडरिंग होऊनही बांधकामास मुहूर्त गसवला नाही. यामुळे कधी सुरु होणार, असा प्रश्न प्रकल्पग्रस्त नागरिक उपस्थित करीत आहेत.
कारंजा तालुक्याचा काही भाग सुजलाम्, सुफलाम् करण्यासाठी व शहराची आजीवन तहाण भागावी म्हणून हा प्रकल्प निर्माण करण्यात आला. प्रकल्पामुळे परिसरातील कोरडवाहु जमीन ओलिताखाली आली. यासाठी ज्यांनी जमिनी दिल्या, त्यांचीच अवस्था दयनीय झाली आहे. त्यांना अद्यापही १८ नागरी सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याचेच दिसून येत आहे.

Web Title: Tender sanctioned; But there is no address of work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.