लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : महावितरणच्या विभागीय कार्यालयांतर्गत वाघोली येथील शेतकरी हिरामण महादेव नौकरकार यांचा कृषीपंपाचा विद्युत पुरवठयाचे वीज खांब आणि तार तुटुन १४ महिने विद्युत पुरवठा बंद ठेवल्या प्रकरणी विद्युत लोकपाल नागपूर यांनी दोषी अभियंत्याला दहा हजारांचा दंड ठोठावला. शिवाय सदर दंडाची रक्कम अर्जदारास मानसीक त्रास, गैरसोय तसेच इतर खर्चाची भरपाई म्हणून आदेशाच्या ३० दिवसांच्या आत देण्याच्या लेखी सूचना दिल्या आहेत. परिणामी, महावितरणच्या अडचणीत भर पडली आहे.हिंगणघाट तालुक्यातील वाघोली येथील शेतकरी हिरामण नौकरकार यांचा कृषीपंपाच्या विद्युत पुरवठ्याचे वीज खांब आणि विद्युत तारा ७ फेब्रुवारी २०१६ ला तुटूनही ८ जून २०१७ पर्यंत विद्युत पुरवठा बंद ठेवण्यात आला. ही समस्या निकाली निघावी म्हणून ११ एप्रिल २०१६ ला सदर शेतकऱ्याने संबंधितांना लेखी तक्रार दिली; पण महावितरणच्या कर्मचाºयांनी ४८ तासात विद्युत पुरवठा सुरळीत केला नाही. संबंधितांना वारंवार विनंती अर्ज करूनही दुर्लक्ष करण्यात आल्याने अर्जदाराने तक्रार निवारण कक्ष वर्धा यांच्याकडे दाद मागितली. यावर सुनावणी होवून ४८ तासात विद्युत पुरवठा सुरू करण्याचा आदेश देऊन नुकसान भरपाई विहित मुदतीत महावितरणच्या अधिकाºयांनी केली नाही. त्यानंतर अर्जदाराने ग्राहक गाºहाणे निवारण मंच महावितरण नागपूर यांच्याकडे प्रकरण दाखल केले. या मंचाने यावर सुनावणी घेऊन प्रकरण मुदत बाह्य असल्याचे दर्शवून प्रकरण खारीज केले. हा आदेश मान्य नसल्याने २६ जुन २०१८ ला अर्जदाराने विद्युत लोकपाल नागपूर यांच्याकडे दाद मागितली. त्यांनी दोन्ही बाजूचा युक्तीवाद लक्षात घेवून सदर निर्णय दिला आहे.
महावितरणच्या अभियंत्याला दहा हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 23:48 IST
महावितरणच्या विभागीय कार्यालयांतर्गत वाघोली येथील शेतकरी हिरामण महादेव नौकरकार यांचा कृषीपंपाचा विद्युत पुरवठयाचे वीज खांब आणि तार तुटुन १४ महिने विद्युत पुरवठा बंद ठेवल्या प्रकरणी विद्युत लोकपाल नागपूर यांनी दोषी अभियंत्याला दहा हजारांचा दंड ठोठावला.
महावितरणच्या अभियंत्याला दहा हजारांचा दंड
ठळक मुद्देविद्युत लोकपालांचा न्यायनिवाडा