शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

दहा प्रकल्प होणार गाळमुक्त; ठरणार साठवणुकीस उपयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2022 05:00 IST

वर्धा जिल्ह्यातील प्रकल्पांची पाणी साठवण क्षमता वाढावी तसेच जिल्ह्यातील प्रमुख दहा प्रकल्पांना गाळमुक्त करण्यासाठी ग्रीन थम्ब ही सामाजिक संस्था इतर विविध सामाजिक संस्थांचेही सहकार्य घेणार आहे. प्रकल्पांच्या पाणी साठवण क्षमतेत वाढ होण्यासाठी प्रकल्प गाळमुक्त करणे या राष्ट्रीय कामात लोकसहभाग वाढावा म्हणून विविध सामाजिक संस्थांचे सहकार्य घेतले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : पुणे येथील खडकवासला धरणातील तब्बल २५ लाख ट्रक गाळ काढून आणखी मोठ्या प्रमाणात गाळ काढल्या जात असलेल्या ग्रीन थम्ब या संस्थेच्या पुढाकाराने वर्धा जिल्ह्यातील तब्बल दहा प्रकल्पातून गाळ काढून या प्रकल्पांना गाळमुक्त करण्यात येणार आहे. आगामी काळात हे काम कसे पूर्णत्त्वास जाईल याबाबतचा ॲक्शन प्लॅन गुरुवारी जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आला आहे. लोकसहभागातून होणाऱ्या या कामाविषयी जिल्हा प्रशासनही सकारात्मक असून लवकरच प्रत्यक्षात कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

या दहा प्रकल्पांतून काढला जाणार गाळ-    देवळी तालुक्यातील कोल्हापूर, आर्वी तालुक्यातील कुऱ्हा, महाकाळी, उमरी, सारंगपुरी, हिंगणघाट तालुक्यातील पोथरा, आष्टी तालुक्यातील आष्टी, सेलू तालुक्यातील डोंगरगाव, कारंजा तालुक्यातील कार प्रकल्प, सेलू तालुक्यातील बाेरधरण या तलावातून गाळ काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले हे विशेष.

विविध सामाजिक संघटनांचेही घेणार सहकार्य

-    वर्धा जिल्ह्यातील प्रकल्पांची पाणी साठवण क्षमता वाढावी तसेच जिल्ह्यातील प्रमुख दहा प्रकल्पांना गाळमुक्त करण्यासाठी ग्रीन थम्ब ही सामाजिक संस्था इतर विविध सामाजिक संस्थांचेही सहकार्य घेणार आहे. प्रकल्पांच्या पाणी साठवण क्षमतेत वाढ होण्यासाठी प्रकल्प गाळमुक्त करणे या राष्ट्रीय कामात लोकसहभाग वाढावा म्हणून विविध सामाजिक संस्थांचे सहकार्य घेतले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

पालकमंत्र्यांनीही जाणली माहिती-    ग्रीन थम्ब या सामाजिक संस्थेच्या प्रतिनिधींनी गुरुवारी पालकमंत्री सुनील केदार, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत वर्धा जिल्ह्यातील कुठल्या प्रकल्पातून गाळ काढला जाईल, शिवाय त्याबाबतचा ॲक्शन प्लॅन कसा राहील, याबाबतची सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी ग्रीन थम्ब या संस्थेचे अध्यक्ष कर्नल सुरेश पाटील आणि सुनील रहाणे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

मागेल त्या शेतकऱ्यास मिळेल गाळ-    विविध प्रकल्पांमधील गाळ हा शेतीची सुपिकता वाढविण्यासाठी फायद्याचा ठरतो. त्यामुळे मागेल त्या शेतकऱ्याला गाळ दिला जाणार असल्याचेही सांगण्यात आले.

वर्धा जिल्ह्यातील दहा प्रकल्पातून गाळ काढला जाणार आहे. त्यासंदर्भातील ॲक्शन प्लॅन वर्ध्याचे पालकमंत्री सुनील केदार, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांना सादर केला आहे. मागेल त्या शेतकऱ्याला गाळ उपलब्ध करून दिला जाणार असून लोकसहभागातूनच हे काम होणार आहे.- कर्नल सुरेश पाटील, अध्यक्ष, ग्रीन थम्ब संस्था.

 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पDamधरण