शिक्षकांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे
By Admin | Updated: October 13, 2016 01:27 IST2016-10-13T01:27:03+5:302016-10-13T01:27:03+5:30
विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अध्यापन कार्य करावे आणि शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना प्रगत करण्याच्या

शिक्षकांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे
जी.शी. टेंभूर्णे : तंत्रस्नेही व प्रेरणा कार्यशाळा
वर्धा : विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अध्यापन कार्य करावे आणि शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना प्रगत करण्याच्या दृष्टिकोनातून आधुनिक तंत्रज्ञानाचा अध्ययन-अध्यापन कार्यात वापर करावा. यासाठी शिक्षकांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे, असे आवाहन न.प. शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी जी.शी. टेंभुर्णे यांनी केले.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या उपक्रमांतर्गत ते न.प. शिवाजी उच्च प्राथमिक शाळा येथे आयोजित तंत्रस्नेही व प्रेरणा कार्यशाळेच्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून न.प. केंद्र समन्वयक ज्ञानेश्वर पिसे, ज्येष्ठ मुख्याध्यापक चारुदत्त जमाने आदी उपस्थित होते.
कार्यशाळेत पुढे बोलताना टेंभुर्णे यांनी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या कार्यक्रमाचा उद्देश आणि शिक्षकांची जबाबदारी समजावून सांगितली. सोबतच विद्यार्थ्यांना प्रेरणा देणाऱ्या विविध खेळांची ओळख त्यांनी याप्रसंगी करुन दिली.
कार्यशाळेच्या प्रारंभी पे्ररणा देणाऱ्या काही विडीओ क्लिप्स दाखविण्यात आल्या. यावेळी न.प. च्या सर्व शाळांनी पावरपॉर्इंट प्रेझेंटेशन द्वारे शालेय उपक्रमाचे सादरीकरण केले.
कार्यशाळेमध्ये तंत्रस्रेही शिक्षिका सुमन ठाकुर यांनी युट्युबबद्दल माहिती दिली. तर पदमश्री मेघे यांनी विडीओ कसा तयार करावा याबद्दल मार्गदर्शन केले. संगीता कापसे यांनी अॅप कसे डाऊनलोड करावे याविषयी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर पिसे यांनी केले. संचालन गणेश पांढरे यांनी केले तर आभार निलेश गुल्हाने यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सुरेश पोहाणे, सुषमा नागापुरे, मनोज शुक्ला आदींनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)