शिक्षकांनी मतदार यादी पुनर्निरीक्षणाचे काम नाकारले
By Admin | Updated: May 1, 2015 01:36 IST2015-05-01T01:36:23+5:302015-05-01T01:36:23+5:30
जिल्हा परिषद शिक्षकांना दिलेले मतदार यादी पुनर्निरीक्षणाचे काम नाकारत

शिक्षकांनी मतदार यादी पुनर्निरीक्षणाचे काम नाकारले
समुद्रपूर : जिल्हा परिषद शिक्षकांना दिलेले मतदार यादी पुनर्निरीक्षणाचे काम नाकारत शिक्षकांना दिलेले साहित्य परत न स्विकारल्यामुळे त्यांनी तहसील मध्येच सोडूले. या प्रकारामुळे गुरुवारी तहसील कार्यालयत चांगलीच चर्चा रंगली होती.
नुकत्याच निघालेल्या परिपत्रकानुसार संदर्भ ६ मध्ये आर.टी.ई अॅक्ट २००९ मधील प्रकरण ४ मध्ये कलम २६ नुसार शिक्षकांना जणगणना, नैसर्गिक आपत्ती तसेच निवडणूक (विधीमंडळ/सांसद) ही कामे वगळून इतर कोणतेही अशैक्षणिक कामे देऊ नये असा निर्णय देण्यात आला. त्यामुळे सदर शिक्षकांनी त्यांच्याकडे असलेली मतदार यादी पुनर्निरीक्षणाचे काम नाकारत त्यांना दिलेले साहित्य तहसीलदार पुष्पलता कुमरे यांच्याकडे परत देण्यास प्रारंभ केला. तहसीलदारांनी साहित्य परत न घेता बीएलओची नियुक्ती उपविभागीय अधिकारी करतात तेव्हा आपण त्यांना निवेदन द्या. त्यांच्या आदेशानुसार मी साहित्य परत घेईल अशी भूमिका घेतली. शिक्षकांनी तुम्ही आम्हाला साहित्य दिले ते तुम्हीच घ्यावे अशी भूमिका घेतली. शिक्षण संचालकानी काढलेल्या परिपत्रकानुसार आम्ही अशैक्षणिक कामे करणार नाही असे म्हणत ते साहित्य तिथेच सोडून शिक्षक निघून गेले. सदर साहित्याची विल्हेवाट कशी लावावी हा प्रश्न तहसीलदार कुमरे यांना पडल्यानंतर त्यांनी सदर बाब वरिष्ठांना कळविली आहे. (तालुका प्रतिनिधी)