‘त्या’ शिक्षकांच्या पाठीवर मारणार कौतुकाची थाप
By Admin | Updated: September 18, 2014 23:39 IST2014-09-18T23:39:32+5:302014-09-18T23:39:32+5:30
पंचायत समितीस्तरावरील जिल्हा परिषदेच्या शाळांचा शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांमार्फत आढावा घेणार आहे. दरम्यान, चांगल्या शिक्षकांचीही नोंद घेतली जाणार आहे. अशा शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी

‘त्या’ शिक्षकांच्या पाठीवर मारणार कौतुकाची थाप
राजेश भोजेकर ल्ल वर्धा
पंचायत समितीस्तरावरील जिल्हा परिषदेच्या शाळांचा शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांमार्फत आढावा घेणार आहे. दरम्यान, चांगल्या शिक्षकांचीही नोंद घेतली जाणार आहे. अशा शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी पत्र पाठवून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्याचा अभिनव उपक्रम प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने राबविण्याच्या विचारात आहे.
शाळांमध्ये अनेक अडचणी असतात. अशाही परिस्थितीत काही शिक्षण अतिशय प्राणमिकपणे आपले कर्तव्य बजावतात. काही शिक्षक केवळ समस्यांचाच पाढा वाचत असतात. चांगले शिक्षक शोधणे आणि त्या त्या शाळेमध्ये असलेल्या समस्यांचा आढावा घेण्याचा विचार नव्याने रूजू झालेले शिक्षणाधिकारी(प्राथ.) रविंद्र काटोलकर यांच्या संकल्पनेतून पुढे आला आहे. पंचायत समितीस्तरावरील विस्तार अधिकाऱ्यांची यासाठी निवड करण्यात येणार आहे. हे विस्तार अधिकारी आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक शाळांमध्ये स्वत: जातील. ते त्या त्या शाळांमध्ये असेलेल्या समस्यांचा आढावा घेतील, दरम्यान स्थानिक पातळीवरच त्या समस्या सोडविता येत असतील, तर त्याचा निपटारा तेथेच केला जाईल. वरिष्ठ पातळीवरील समस्या असतील तर त्या जिल्हा पातळीवरुन सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल. हे करत असताना शिक्षकांच्या कार्याचेही मुल्यमापन केले जाणार आहे. अशातच बिकट परिस्थितीवर मात करून आपले कर्तव्य बजावत असलेल्या शिक्षकांचीही सकारात्मक दखल घेतली जाईल. अशा शिक्षकांना त्यांच्या कार्याचे कौतुक करणारे पत्र पाठविले जाईल, अशी ही संकल्पना आहे. यामुळे शिक्षकांना आपले कर्तव्य बजावताना प्रोत्साहन मिळेल, अशी या उपक्रमामागील शिक्षण विभागाची भूमिका असणार आहे.