शिक्षकांचे आमरण उपोषण सुरू
By Admin | Updated: April 27, 2016 02:24 IST2016-04-27T02:24:56+5:302016-04-27T02:24:56+5:30
शिक्षण उपसंचालकांनी मार्च २०१६ च्या दुसऱ्या आठवड्यात शिक्षण सेवकांकरिता वैयक्तिक मान्यता शिबिर घ्यावे,

शिक्षकांचे आमरण उपोषण सुरू
वर्धा : शिक्षण उपसंचालकांनी मार्च २०१६ च्या दुसऱ्या आठवड्यात शिक्षण सेवकांकरिता वैयक्तिक मान्यता शिबिर घ्यावे, असे आदेश निर्गमित केले. तसेच शिक्षणाधिकारी यांनी ४ ते ८ एप्रिलदरम्यान शिबिर घेण्यात येईल अशी लेखी हमी दिली. तरीही शिबिर झाले नाही. त्यामुळे सोमवारपासून पीडित शिक्षकांनी जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केले.
यापूर्वी २ मार्च २०१६ ला याच मागण्यांसाठी शिक्षकांनी उपोषण सुरू केले. त्यावेळी शिबिर एप्रिल महिन्यात घेण्यात येईल, अशी लेखी हमी दिल्याने आंदोलन स्थगित झाले. मात्र अंमलबजावणी झाली नाही. २ मे २०१२ पूर्वी शिक्षणाधिकारी कार्यालयाचे नाहरकत प्रमाणपत्र घेवून जिल्ह्यात केलेल्या नियुक्त्यांना वैयक्तिक मान्यता मिळण्याबाबत जानेवारी २०१५ मध्ये शिबिराचे आयोजन केले होते. पण काही त्रुट्यांअभावी २० शिक्षणसेवकांना वैयक्तिक मान्यता मिळू शकली नाही. ते शिक्षक साडेतीन वर्षापासून वेतनापासून वंचित आहे. शिक्षक आमदार गाणार यांनी शिक्षण उपसंचालक यांच्याशी चर्चा केली. एप्रिल महिन्यात हे शिबिर आयोजित करण्याची लेखी हमी शिक्षणाधिकारी यांनी दिली. अंमलबजावणी न झाल्याने सोमवारपासून वंचित शिक्षकांनी जि.प.समोर मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत उपोषण सुरू केल्याचे समितीचे कार्यवाह अजय भोयर यांच्या सांगितले.(शहर प्रतिनिधी)