लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील गांधी सिटी पब्लिक स्कूलमध्ये शिकविणाऱ्या शिक्षकावर चुकीचे आरोप केल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. मागील चार दिवसांपासून ते अटकेत असल्यामुळे त्यांच्यावरील सर्व आरोप निराधार असून त्यांची सुटका करण्यात यावी, अशी मागणी पालक तथा विद्यार्थ्यांनी निवेदनातून केली आहे.शिक्षक राकेश शिंदे हे मागील पाच वर्षापासून गांधी सिटी पब्लिक स्कूलमध्ये शिकवित आहे. त्यांच्याकडून नेहमीच पेशाला साजेसे वर्तन राहीले आहे. परंंतू शहरातील एका व्यक्तिीकडून गंभीर आरोप करीत तक्रार देण्यात आल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. आमचीही मुल-मुली या शाळेत शिक्षण घेत असून त्यांच्या प्रगतीबाबत आम्ही नेहमीच शिक्षक राकेश यांच्यासोबत चर्चा करीत असतो. त्यामुळे त्यांच्या वागण्या, बोलण्यात काही वावग जाणवल नाही.तेव्हा त्यांच्यावर केलेले आरोप निराधार असून त्यांची तत्काळ सुटका करण्यात यावी, अशी मागणी पालक, विद्यार्थी व सहकारी शिक्षकांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. यावेळी सहकारी शिक्षक, विद्यार्थी व पालकांची उपस्थिती होती.
शिक्षकावरील आरोप खोटे; त्यांची सुटका करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 23:48 IST
शहरातील गांधी सिटी पब्लिक स्कूलमध्ये शिकविणाऱ्या शिक्षकावर चुकीचे आरोप केल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. मागील चार दिवसांपासून ते अटकेत असल्यामुळे त्यांच्यावरील सर्व आरोप निराधार असून त्यांची सुटका करण्यात यावी, अशी मागणी पालक तथा विद्यार्थ्यांनी निवेदनातून केली आहे.
शिक्षकावरील आरोप खोटे; त्यांची सुटका करा
ठळक मुद्देपालकांची मागणी : जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षकांना निवेदन