शिक्षकाला दोन वर्षे सश्रम कारावास
By Admin | Updated: October 9, 2015 02:32 IST2015-10-09T02:32:28+5:302015-10-09T02:32:28+5:30
विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणाऱ्या हिंगणघाट येथील चुन्नीलाल कटारिया प्राथमिक शाळेचा शिक्षक वसंत कापसे रा. यशवंत नगर, ..

शिक्षकाला दोन वर्षे सश्रम कारावास
वर्धा : विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणाऱ्या हिंगणघाट येथील चुन्नीलाल कटारिया प्राथमिक शाळेचा शिक्षक वसंत कापसे रा. यशवंत नगर, हिंगणघाट याला दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. हा निकाल येथील प्रथम श्रेणी न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी उ.ना. पाटील यांनी दिला.
थोडक्यात हकीकत अशी की, चुन्नीलाल कटारिया प्राथमिक शाळेचा शिक्षक वसंत बापूराव कापसे हा शाळेतील मुलींशी अश्लील चाळे करतो, अशी तक्रार हिंगणघाट पोलीस ठाण्यात ३० मार्च २००९ रोजी करण्यात आली होती. यावरून शिक्षकाविरूद्ध कलम ३५४, ५०६ भादंवि प्रमाणे गुन्हा नोंदवून गुन्ह्याचा तपास जमादार विजय कापसे यांनी पूर्ण करून आरोपीविरूद्ध दोषारोपत्र हिंगणघाट येथील प्रथम श्रेणी न्यायालय न्यायप्रविष्ट केले.
सदर प्रकरण हे न्यायदंडाधिकारी उ.ना.पाटील यांच्या न्यायालयात आले. सादर केलेल्या पुराव्यावरून आरोप सिद्ध झाल्याने वसंत कापसे याला या कलम ३५४ भादंवि अन्वये दोन वर्षे सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंड व कलम ५०६ भादंविमध्ये २५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ६ महिने अधिक करावास, अशी शिक्षा ठोठावली.
सरकारी पक्षाच्यावतीने अभियोक्ता ताडेवाड, पैरवी अधिकारी सहायक फौजदार रमेश गेडाम, जमादार अशोक निमजे यांनी काम पाहिले.(प्रतिनिधी)