क्षयरोग विभागाचा लाचखोर लेखापाल एसीबीच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 23:36 IST2017-10-17T23:35:58+5:302017-10-17T23:36:12+5:30
क्षयरोग विभागाचा कंत्राटी लेखापाल अमित राजेश दुबे याला त्याच्या तीन सहकाºयांकडून टीए बिल आणि पेट्रोलचे देयक काढण्याकरिता १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांची अटक केली.

क्षयरोग विभागाचा लाचखोर लेखापाल एसीबीच्या जाळ्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : क्षयरोग विभागाचा कंत्राटी लेखापाल अमित राजेश दुबे याला त्याच्या तीन सहकाºयांकडून टीए बिल आणि पेट्रोलचे देयक काढण्याकरिता १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांची अटक केली. ही कारवाई मंगळवारी दुपारी करण्यात आली.
लाचलुचपत विभागाच्या अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कंत्राटी पद्धतीने एसटीएस सुपरवायझर या पदावर उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे कार्यरत आहे. त्यांचे व इतर तीन सहकाºयांचे सन २०१७ चे टीए बिल व पेट्रोल देयक मंजुरीकरिता देण्यात आले होते. या अगोदर प्राप्त असलेले सन २०१६ चे टीए बिल व पेट्रोल बिलाच्या एकूण बिलाच्या ५० टक्के रक्कम अमित दुबे हे लाच म्हणून मागत होते. परंतु तक्रारदारांना लाच देण्याची मुळीच ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वर्धा येथे तक्रार नोंदविली.
या तक्रारीवरुन मंगळवारी लाच मागणी संबंधाची पडताळणी करण्यात आली. जिल्हा क्षयरोग केंद्राचे कंत्राटी लेखापाल अमित दुबे यांनी तक्रारदारास व त्यांच्या इतर तीन सहकाºयांच्या देयकापोटी एकूण देयकाच्या ५० टक्के रक्कम म्हणजेच १५ हजार रुपयांची मागणी केली. लाच स्वीकारून गैरकायदेशीर मार्गाने स्वत:चा आर्थिक फायदा करुन घेतला. अमित दुबे यांचे कृत्य कलम ७,१३(१)(ड), सह १३(२) ला प्र.का. १९८८ अन्वये गुन्हा होत असल्याने त्याच्या विरुद्ध वर्धा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आली आहे.
सदर कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील, तसेच पोलीस उपअधीक्षक दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक रामजी ठाकुर, पोलीस निरीक्षक अभय दाभाडे, पल्लवी बोबडे, अतुल वैद्य, विजय उपासे, सागर भोसले यांनी केली आहे.