१३ केबल डिस्ट्रीब्युटर्सकडे थकला १३.२0 लाखांचा कर

By Admin | Updated: May 13, 2014 00:04 IST2014-05-13T00:04:04+5:302014-05-13T00:04:04+5:30

दूरचित्रवाणीच्या माध्यमातून दाखविण्यात येणार्‍या विविध वाहिन्यांवर महसूल विभागाचा करमणूक कर पडतो. मार्च अखेरपर्यंत दरवर्षाचा करमणूक कर नियमीत केबल ऑपरेटर्सना भरावा लागतो.

Taxes of 13.20 lakh to 13 cable distributors | १३ केबल डिस्ट्रीब्युटर्सकडे थकला १३.२0 लाखांचा कर

१३ केबल डिस्ट्रीब्युटर्सकडे थकला १३.२0 लाखांचा कर

सुरेंद्र डाफ - आर्वी

दूरचित्रवाणीच्या माध्यमातून दाखविण्यात येणार्‍या विविध वाहिन्यांवर महसूल विभागाचा करमणूक कर पडतो. मार्च अखेरपर्यंत दरवर्षाचा करमणूक कर नियमीत केबल ऑपरेटर्सना भरावा लागतो. यंदा मात्र एप्रिल महिना उलटूनही कराचा भरणा करण्यात आला नाही. कर भरण्याच्या नावावर केवळ नाममात्र कर भरला गेल्याने अद्याप १३ लाख २0 हजार रुपये थकीत आहे.

सन २0१३-१४ व २0१४-१५ या आर्थिक वर्षात थकीत करमणूक कर १७ लाख ९४ हजार ९४५ रुपयांच्यावर गेल्याने तहसीलदारांनी वसूलीकरिता मोहीम राबविली. यात केबल धारकांनी ४ लाख ७४ हजार ३६४ रुपयांचा भरणा केला आहे. यात विभागातील सर्वच केबल धारकांचा समावेश आहे.

आर्वी शहरात एकूण १७ तर ग्रामीण भागात आठ केबल ऑपरेटर आहेत. यात आर्वीत २,५३७ जुने तर ४,१९६ नवीन केबल धारक आहेत. दरवर्षी आर्थिक वर्षाच्या अखेर हा मनोरंजन कर केबल ऑपरेटर्सना महसूल विभागात भारावा लागतो. यात २0१३-१४ व २0१४-१५ या आर्थिक वर्षात आर्वीसह तालुक्यातील केबल ऑपरेटर्सनी १७ लाख ९४ हजार ९४५ रुपयांचा भरणा केला. या सर्व केबल ऑपरेटर्सकडे मनोरंजन कराची १३ लाख २0 हजारांची रक्कम थकली आहे.

आर्वी शहराचा वाढता विस्तार व तालुक्यातील गावाची संख्या पाहता महसूल विभागाने केबल कनेक्शन धारकांची सांगितलेली संख्या संभ्रमात टाकणारी आहे. यापेक्षा केबल जोडणीची खरी संख्या अधिक आहे. यात महसूल विभागाने केबल धारकांची काही माहिती व वाढलेली आकडेवारी लक्षात घेऊन नव्याने सर्व्हे करण्याची गरज आहे. यातून आर्वी व तालुक्यातील खर्‍या केबल धारकांची आकडेवारी समोर येऊन शासनाचा मनोरंजन करापोटी बुडत जाणारा लाखो रुपयांचा महसूल वसूल करण्यास मदत होईल.

Web Title: Taxes of 13.20 lakh to 13 cable distributors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.