शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

तृष्णातृप्तीसाठी टँकर ठरताहेत मदतगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 22:00 IST

जंगलव्याप्त परिसर म्हणून आर्वी, आष्टी, कारंजा व सेलू तालुक्याची ओळख आहे. याच परिसरात वाघ, अस्वल, मोर, हरिण, रोही आदी वन्यप्राणीही मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र, सध्या भूगर्भातील पाणी पातळी झपाट्याने खालावल्याने आणि अनेक नैसर्गिक पाणवठे कोरडे झाल्याने सध्या टँकरच्या सहाय्याने कृत्रिम पाणवठ्यांमध्ये पाणी टाकले जात आहे.

ठळक मुद्देआर्वी अन् खरांगणा वनपरिक्षेत्रात पाणीटंचाई

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जंगलव्याप्त परिसर म्हणून आर्वी, आष्टी, कारंजा व सेलू तालुक्याची ओळख आहे. याच परिसरात वाघ, अस्वल, मोर, हरिण, रोही आदी वन्यप्राणीही मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र, सध्या भूगर्भातील पाणी पातळी झपाट्याने खालावल्याने आणि अनेक नैसर्गिक पाणवठे कोरडे झाल्याने सध्या टँकरच्या सहाय्याने कृत्रिम पाणवठ्यांमध्ये पाणी टाकले जात आहे. वनविभागाकडून केली गेलेली ही सोय वन्यप्राण्यांच्या तृष्णातृप्तीसाठी मदतगारच ठरत आहे.यंदा वनविभागाने जिल्ह्यातील विविध भागात तब्बल १५० कृत्रिम पाणवठे तयार करून वन्यप्राण्यांच्या अधिवासात त्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. असे असले तरी रोही, हरिण, माकड, नीलगाय आदी झाडांची पाने खाऊन जगणारे वन्यप्राणी जंगलात मुबलक प्रमाणात चारा नसल्याने शेतशिवारांकडे धाव घेत असल्याचे दिसून येत आहे. इतकेच नव्हे, तर काही हिंसक पाण्याच्या शोधार्थ शेतशिवारांकडे धाव घेत असल्याचे चित्र आहे. यामुळे वन्यप्राणी आणि मनुष्य यांच्यात संघर्ष होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनीही कृत्रिम पाणवठ्यांच्या आवारातच वन्यप्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्यासह मुबलक प्रमाणात चारा कसा उपलब्ध करून देता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे. तशी वन्यजीप्रेमींची मागणीही आहे. सध्या नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. काही भागातील नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठाही केला जात आहे. ज्या पद्धतीने मनुष्यासाठी टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. त्याच पद्धतीने सध्या वनविभागाच्यावतीने वन्यप्राण्यांच्या अधिवासात टँकरद्वारे कृत्रिम पाणवठ्यांमध्ये पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. असे असले तरी आर्वी आणि खरांगणा या भागातील जंगलातील अनेक नैसर्गिक पाणवठे आटल्याने आणि काही कृत्रिम पाणवठ्यांच्या बोअरवेलने तळ गाठल्याने खासगी टँकर लावून कृत्रिम पाणवठे पाण्यानी भरली जात आहे. त्यामुळे मनुष्यासह वन्यप्राण्यासाठी टँकरने होणारा पाणी पुरवठा मदतगार ठरत आहे.मार्च अखेरीस दिला मोबदलाखरांगणा वन परिक्षेत्रात एकूण १६ कृत्रिम पाणवठे असून येथे पीपल फॉर अ‍ॅनिमल्सच्या सहकार्याने कृत्रिम पाणवठ्यांमध्ये नि:शुल्क पाणी टाकले जात आहे. इतकेच नव्हे, तर याच वनपरिक्षेत्रातील बोअरवेल असलेल्या सहा कृत्रिम पाणवठ्यांपैकी तीन बोअरवेल असलेल्या कृत्रिम पाणवठ्यांच्या आवारातील बोअरवेलने तळ गाठल्याने एका खासगी टँकरच्या सहाय्याने पाणवठ्यांमध्ये पाणी भरले जात आहे. मार्च अखेरीस सुमारे १० हजारांचे देयक टँकर मालकाला देण्यात आले आहे. तर आर्वी वनपरिक्षेत्रात सात नैसर्गिक पाणवठे आणि पाच कृत्रिम पाणवठे आहेत. त्यापैकी बोअरवेल असलेले तीन पाणवठे आहेत. मात्र, तेथेही पाणीटंचाई असल्याने एक खासगी टँकर लावण्यात आला आहे. याच टँकरच्या सहाय्याने सध्या पाणवठ्यांमध्ये पाणी टाकले जात आहे. येथेही मार्च अखेरीस टँकर मालकाला देयक अदा करण्यात आले आहे.

टॅग्स :Waterपाणीforestजंगल