टाकळीला पंचधारा नदीच्या पुराचा धोका
By Admin | Updated: August 4, 2016 00:39 IST2016-08-04T00:39:41+5:302016-08-04T00:39:41+5:30
सेलू तालुक्यातील टाकळी (झडशी) गावलगत वाहणाऱ्या पंचधारा नदीमुळे ग्रामस्थांना धोका उत्पन्न झाला आहे

टाकळीला पंचधारा नदीच्या पुराचा धोका
मदतीची मागणी : आपत्ती व्यवस्थापनाचा अभाव
वर्धा : सेलू तालुक्यातील टाकळी (झडशी) गावलगत वाहणाऱ्या पंचधारा नदीमुळे ग्रामस्थांना धोका उत्पन्न झाला आहे. अल्पशा पुरानंतर पाणी गावात शिरत असल्याने नदीकाठावरील घरे व रहिवाशी असुरक्षित झाले आहे. प्रशासनाकरवी आपत्ती व्यवस्थापनाचा कोणतीच उपाययोजना केली नसल्याने येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी नवाल यांची भेट घेऊन समस्यांचे निवेदन दिले.
पंचधारा नदीच्या काठावर टाकळी (झडशी) हे गाव वसले आहे. नदीला थोडा जरी पूर आला तरी पुराचे पाणी येथील नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचते. या पुराचा धोका होऊ नये म्हणून नागरिकांनी घरापासून काही अंतरावर म्हणजेच नदी काठावर उंचवट भाग तयार केला. त्यात काहींनी उंच ओटे तर काहींन मलबा टाकून उंचवट बांध तयार केले आहे. त्यामुळे नदीचे पाणी त्याला अडून घरापर्यंत येत नव्हते. पुरामुळे असुरक्षिततेत जीवन जगणाऱ्या येथील नागरिकांनी उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनासह जिल्हा प्रशासनाकडे वारंवार केली. याकडे कोणीही लक्ष दिलेले नाही. काही दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे येथील घरांना पुरापासून धोका आहे. येथे बांधलेले ओटे आणि बांध खचत आहेत. पूर वाढल्यास घरांमध्ये पाणी शिरून मालमत्तेची हानी व जीवितास धोका आहे. निवेदन देताना डॉ. सतीश सावरकर, विष्णू सावरकर, प्रफुल्ल सावरकर, गजानन दोडके आदी उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)
अल्पशा पुरानंतर गावात शिरते पाणी
सतत सुरू असलेल्या पावसामुळे पंचधारा नदीला पुर आला आहे. या पुराचे पाणी हल्ली घरापर्यंत पोहोचले आहे. नदी काठावरील घरांसमोर असलेला अर्धाअधिक रस्ता हा पाण्यात असून येथील नागरिकांना पावसाळ्याच्या दिवसात जागुनच रात्र काढावी लागते. आणखी किती दिवस पुरावर लक्ष ठेवण्याकरिता येथील नागरिकांच्या नशीब रात्रीची झोप येणार नाही हे सांगणे कठीण आहे.
नागरिकांनी घरापासून काही अंतरावर म्हणजेच नदी काठावर उंचवट भाग तयार केला. त्यात काहींनी उंच ओटे तर काहींन मलबा टाकून उंचवट बांध तयार केले आहे. त्यामुळे नदीचे पाणी त्याला अडून घरापर्यंत येत नव्हते. आता बांधलेले ओटे किंवा टाकलेले बांध खचु लागले आहेत. आताच पुराचे पाणी घरापर्यंत पोहोचते आहे.