घाणीच्या साम्राज्यात पार पडताहेत तालुका क्रीडा स्पर्धा

By Admin | Updated: August 31, 2016 01:02 IST2016-08-31T01:02:37+5:302016-08-31T01:02:37+5:30

सेलू येथील तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर सोमवारपासून तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा सुरू झाल्या

Taluka sports competition in the dirt kingdom | घाणीच्या साम्राज्यात पार पडताहेत तालुका क्रीडा स्पर्धा

घाणीच्या साम्राज्यात पार पडताहेत तालुका क्रीडा स्पर्धा

घोराड : सेलू येथील तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर सोमवारपासून तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा सुरू झाल्या आहेत. या संकुलाची परिस्थिती पाहता घाणीच्या साम्राज्यात क्रीडा स्पर्धा होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे पालक वर्गात संतापाची लाट पसरली आहे. या स्पर्धा जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने आयोजित केल्या आहे. क्रीडा संकुलातील दोन खोल्या याकरिता खुल्या करण्यात आल्या आहेत.

Web Title: Taluka sports competition in the dirt kingdom