तालुका कृषी अधिकाऱ्याच्या नामफलकाला हार

By Admin | Updated: May 17, 2016 01:48 IST2016-05-17T01:48:00+5:302016-05-17T01:48:00+5:30

तालुका कृषी कार्यालयाच्यावतीने अंतोरा व तारासावंगा येथील शंभरावर शेतकऱ्यांना उन्हाळी भुईमुगाचे बियाणे

Taluka Agriculture Officer's name booklet lost | तालुका कृषी अधिकाऱ्याच्या नामफलकाला हार

तालुका कृषी अधिकाऱ्याच्या नामफलकाला हार

 बोगस भुईमूग बियाणे प्रकरण : निवेदनानंतरही कारवाई नाही
आष्टी (शहीद) : तालुका कृषी कार्यालयाच्यावतीने अंतोरा व तारासावंगा येथील शंभरावर शेतकऱ्यांना उन्हाळी भुईमुगाचे बियाणे दिले. हे बियाणे उगवले मात्र त्याला शेंगाच आल्या नसल्याने शेतकऱ्यांना फटका बसला. याचे निवेदन कृषी विभागाला देण्यात आले. यावर कुठलीही कारवाई झाली नसल्याने संतप्तालेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी दुपारी १२ वाजता तालुका कृषी अधिकारी कार्यालय गाठले. येथे निषेध नोंदवीत अधिकाऱ्याच्या नामफलकाला पुष्पहार घातला. विशेष म्हणजे नामफलकावर असलेला अधिकारी चार वर्षापूर्वीच बदलून गेला आहे.
शेतकऱ्यांच्या या मागण्यांकरिता भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळा जगताप, तालुका सरचिटणीस राजेश ठाकरे यांच्यासह शेतकरी कार्यालयात हजर झाले. राजेश ठाकरे यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांना भ्रमणध्वनी करून प्रकरणाची माहिती दिली. लागलीच खा. रामदास तडस यांनाही माहिती दिली. यावर खा. तडस यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भारती यांना प्रकरणात तात्काळ कारवाईचे निर्देश दिले. दोन दिवसात कारवाई करण्यात न झाल्यास संपूर्ण शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांच्या कार्यालयात आंदोलनाचा इशारा यावेळी दिला.

४तारासावंगा- उन्हाळी हंगामात आष्टी तालुका कृषी विभागामार्फत महाराष्ट्रासाठी भुईमुगाचे टीएजी २४ बियाने प्रस्तावित होते. असे असताना कृषी विभागामार्फत के ६ या जातीचे बियाणे ५० टक्के अनुदानावर शेतकर्ऱ्यांना वाटप करण्यात आले पण या बियानाला शेंगाच न आल्यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे. शेतकऱ्यांना देण्यात आलेले बियाणे महाराष्ट्रातील वातावरणाला साथ न देणारे असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

भुईमूग बियाणे नॅशनल सीड कॉर्पोरेशन मार्फत घेतलेले आहे. बियाणे उगविले मात्र शेंगा लागल्या नाही. यासंदर्भात तपासणी सुरू आहे. शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करणार आहे. बियाण्याला शेंगा लागल्या नाही, असा प्रकार प्रथमच झाला आहे.
- ज्ञानेश्वर भारती, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा

भुईमूग बियाणे उगविले मात्र शेंगा लागल्या नाही. याची दखल घेवून पाहणी करून अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना पाठविला. जिल्हा समिती यावर निर्णय घेणार. बियाणे उगविले मात्र नेमका दोष काय, याचे संशोधन सुरू आहे.
- अरूण बलसाने, उपविभागीय कृषी अधिकारी, आर्वी

Web Title: Taluka Agriculture Officer's name booklet lost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.