ठाणेदारावर कारवाईसाठी तळेगाव बंद
By Admin | Updated: July 5, 2014 01:10 IST2014-07-05T01:10:02+5:302014-07-05T01:10:02+5:30
तळेगाव (श्या.पंत.): येथील युवा शेतकरी रोशन खेरडे हे तक्रार देण्याकरिता तळेगाव पोलीस ठाण्यात गेले असता त्यांनाच ठाणेदार दिनेश झामरे यांनी मारहाण व शिवीगाळ केली.

ठाणेदारावर कारवाईसाठी तळेगाव बंद
तळेगाव (श्या.पंत.): येथील युवा शेतकरी रोशन खेरडे हे तक्रार देण्याकरिता तळेगाव पोलीस ठाण्यात गेले असता त्यांनाच ठाणेदार दिनेश झामरे यांनी मारहाण व शिवीगाळ केली. याप्रकरणी ठाणेदारावर कारवाई करण्याच्या मागणीकरिता शुक्रवारी सर्वपक्षीय बंद पुकारण्यात आला होता.
ठाणेदाराने मारहाण केल्याप्रकरणी सरपंच सुनिता उईके यांच्या नेतृत्वात ग्रामसभा घेवून बंदचा ठराव घेण्यात आला. याकरिता गावकऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले़ यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष चंद्रकांत इंगळे, नामदेव खेरडे, रोशन खेरडे, दिलीप राठी, जमिल खाँ पठाण, दिलीप खडके, अशोक गहूकार, ईश्वर सहारे, विनोद वाणी, शिवनाथ कुचे, ओम खेरडे, किशोर खासबागे उपस्थित होते़ जिल्हा पोलीस अधीक्षकांनी चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले़ या घटनेने गावात तणाव आहे.(वार्ताहर)