सामान्यांच्या न्यायासाठी कायम संघर्षाची भूमिका ठेवा
By Admin | Updated: August 13, 2016 00:45 IST2016-08-13T00:45:50+5:302016-08-13T00:45:50+5:30
राजकारणात काम करताना नेत्यांनी सामान्यांच्या न्यायासाठी कायम संघर्षाची भूमिका ठेवावी, असे प्रतिपादन ...

सामान्यांच्या न्यायासाठी कायम संघर्षाची भूमिका ठेवा
शशिकांत शिंदे : राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता मेळावा
आर्वी : राजकारणात काम करताना नेत्यांनी सामान्यांच्या न्यायासाठी कायम संघर्षाची भूमिका ठेवावी, असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री आणि वर्धा जिल्हा राष्ट्रवादी पक्षाचे प्रभारी आमदार शशिकांत शिंदे यांनी केले.
सहकार मंगल कार्यालय येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलता होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अॅड. दिलीप काळे तर अतिथी म्हणून विधान परिषदेचे आमदार ख्वाजा बेग, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे समीर देशमुख, माजी आमदार राजू तिमांडे, राष्ट्रवादीचे आर्वी तालुकाध्यक्ष सुदाम सरोदे, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, आर्वी विधानसभा क्षेत्रप्रमुख संदीप काळे, गंगाधर काळे, अमित उमरे, माजी जि.प. सदस्य शैला वाघ, साहेबराव पांडे उपस्थित होते. मेळाव्याची भूमिका संदीप काळे यांनी विषद केली. तीन वेळा आर्वी तालुका खरेदी विक्रीचे अध्यक्ष झालेल्या गंगाधर काळे यांचा मान्यवरांनी सत्कार केला.
आयोजनासाठी शहराध्यक्ष संजय बाजपेयी, सूरज अकली, प्रवीण होरे, रेवाशंकर वाघ, तनुज काळे, प्रफुल देशभ्रतार, मुक्तार बशीर शेख, प्रज्वल कांडलकर, अभय दहाट यांनी सहकार्य केले. संचालन प्रफुल ठाकरे तर आभार प्रवीण शिरपूर यांनी मानले.(तालुका/शहर प्रतिनिधी)