भाडेकऱ्याने मिळविला किरायाच्या घरावर केला ताबा
By Admin | Updated: October 31, 2015 03:05 IST2015-10-31T03:05:40+5:302015-10-31T03:05:40+5:30
किरायाच्या घराचे कागदपत्र स्वत:च्या नावे करून घरावर ताबा मिळविला.

भाडेकऱ्याने मिळविला किरायाच्या घरावर केला ताबा
गुन्हा दाखल : पोलिसांचा तपास सुरू
वर्धा : किरायाच्या घराचे कागदपत्र स्वत:च्या नावे करून घरावर ताबा मिळविला. वारसदाराची फसवणूक केल्याबाबत देवळी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून महादेव नामदेव वैरागडे रा. पडेगाव, चंद्रकांत काचोळे या दोघांवर कलम ४४८, १६६, १८२, १६७, १९३, ४०६, ४४२, ११४, १२० ब अन्वये गुन्हा दाखल केला.
दत्तात्रय भलमे रा. ठाणे यांचे वडिलोपार्जित घर देवळी येथे आहे. हे घर काचोळे यांना किरायाने राहायला दिले होते. काचोळे याने परस्पर घराचे कागदपत्र स्वत:च्या नावाने करून घेतले व घरावर ताबा केला. ही बाब भलमे यांना माहिती होताच त्यांनी पोलिसात शुक्रवारी तक्रार दिला. घटनेचा तपास देवळी पोलीस करीत आहे.