शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
3
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
4
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
5
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
6
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
7
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
8
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
9
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
10
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
11
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
12
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
13
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
14
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
15
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
16
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
17
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
18
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
19
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
20
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
Daily Top 2Weekly Top 5

नियमानुसार जमिनीचे अधिग्रहण करा

By admin | Updated: November 16, 2014 23:11 IST

निम्न वर्धा प्रकल्पातील बाधितांसाठी जमिनीचे अधिग्रहण करण्यात येत आहे. परंतु हे अधिग्रहण करताना नियमानुसार व शेतकऱ्यांना विश्वासात घेवून करण्यात यावे, अशी सूचना आ. डॉ. पंकज भोयर

वर्धा : निम्न वर्धा प्रकल्पातील बाधितांसाठी जमिनीचे अधिग्रहण करण्यात येत आहे. परंतु हे अधिग्रहण करताना नियमानुसार व शेतकऱ्यांना विश्वासात घेवून करण्यात यावे, अशी सूचना आ. डॉ. पंकज भोयर यांनी जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांना केली. त्यामुळे सोमवारपासून होणारी सुनावणी रद्द केली आहे.निम्न वर्धा प्रकल्पात बाधित ठरलेल्यांना जमिनीचे वितरण करण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या वतीने सालोड, माळेगाव, हिरापूर, बाळापूर, सेलसुरा, मेघापूर येथील जमिनीचे अधिग्रहण करण्यात येत आहे. परंतु हे अधिग्रहण करताना नियमाला डावलल्या जात असल्याचा आरोप करीत पीडित शेतकऱ्यांनी आ. डॉ. भोयर यांची भेट घेवून त्यांना माहिती दिली. शेतकऱ्यांची व्यथा लक्षात घेवून आ. डॉ. पंकज भोयर हे शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले व त्यांनी संपूर्ण प्रकार जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांच्या लक्षात आणून दिला. जमिनीचे अधिग्रहण करताना संपादनस पात्र क्षेत्र दर्शविणाऱ्या गाव निहाय याद्या सार्वजनिक ठिकाणी प्रसिद्ध करण्यात यावी, या १८ गावांच्या याद्या पुनर्वसन कार्यालयाच्या फलकावरही लावण्यात याव्या, प्रसिद्ध केलेल्या याद्यांवर आक्षेप घेण्यासाठी अवधी देण्यात यावा व या अवधीनंतर अंतिम यादी प्रकाशित करण्यात यावी, संपादन पात्र जमिन ठरविताना ती जमीन २० जुलै १९८१ पूर्वीची धारण केलेली असल्याची शहानिशा करण्यात यावी अशी सूचना करून संपादनप्राप्त जमिनीमध्ये उपकालवा, लघू कालवा या कामाकरिता जमीन प्रस्तावित आहे का याचा अहवाल मागून संपादित जमीन अधिग्रहणातून वगळण्यात यावी, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केली. अधिग्रहणाची कारवाई नियमांच्या विरूद्ध असल्याने महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तीचे पुनर्वसन अधिनियम १९९९ भाग २ नुसार जमिनीचे अधिग्रहण करण्याची सुचना आमदारांनी केली. या सर्व बाबींची शहानिशा करूनच सुनावनिस प्रारंभ करण्यात यावा व १७ नोव्हेंबरपासून होत असलेली सुनावणी स्थगित करण्याची सूचना डॉ. भोयर यांनी केली. त्यावर जिल्हाधिकारी सोना यांनी सोमवारपासून होत असलेली सुनावणी स्थगीत करण्याचे आदेश देत या अधिग्रहणासंबंधी संपूर्ण माहिती देण्याचे आदेश संंबंधितांना दिले. यावेळी जि.प. उपाध्यक्ष विलास कांबळे, पं.स. सदस्य अशोक कलोडे उपजिल्हाधिकारी सुनिल गाडे, मोतिराम टिपले, खुशाल खैरकार, आनंद कासटवार, आशिष कुचेवार, दिनेश वैतागे, सागर टिपले, कासावार उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)