घे शपथ, घे शपथ, घे शपथ ‘नो व्हेईकल डे’ ची...
By Admin | Updated: March 6, 2016 02:31 IST2016-03-06T02:28:25+5:302016-03-06T02:31:58+5:30
देवळी येथे प्रदूषणावर आळा घालण्यासाठी नो व्हेईकल डे पाळला जातो. शनिवारी जागृती रॅलीत शोतोकान कराटे क्लबचे कराटेपटू, राजीव गांधी माध्य. विद्यालय ...

घे शपथ, घे शपथ, घे शपथ ‘नो व्हेईकल डे’ ची...
घे शपथ, घे शपथ, घे शपथ ‘नो व्हेईकल डे’ ची... देवळी येथे प्रदूषणावर आळा घालण्यासाठी नो व्हेईकल डे पाळला जातो. शनिवारी जागृती रॅलीत शोतोकान कराटे क्लबचे कराटेपटू, राजीव गांधी माध्य. विद्यालय व न.प. हायस्कूलचे विद्यार्थी, महालक्ष्मी टीएमटी प्लॅन्टचे कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले. ‘वाढते प्रदूषण रोखण्यासाठी आमचे प्रयत्न राहील. समाजाचे स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी जनजागृती करण्यात येईल, वाहनांचा वापर कमी करून सायकलचा उपयोग करण्यात येईल’, अशी शपथ विद्यार्थ्यांना देण्यात आली. काहींनी १० सायकली विकत घेत सहभाग दिला. यात डॉ. दीपक कोल्हटकर, डॉ. श्रावण साखरकर, मुख्याध्यापक अनिल तडस, विजय पिंपळकर, प्रा. पंकज चोरे, विलास बावणे, राजीव खोडे, प्रशांत भुते, गीता बुंदेले, धर्मेश झाडे, संजय पारीसे, हरिओम उगेमुगे, प्रा. मेहरकिरण गुजर, प्रा. राकेश वाडीभस्मे, प्रा. राजीव रोकडे, प्रा. शशिकांत वाळके, प्रा. महेंद्र बदकुले, शिल्पा भक्ते, हरिभाऊ कानेटकर, अनुप कपूर, प्रवीण फटींग, किरण ठाकरे, गणेश शेंडे, प्रजावीर आचार्य, प्रकाश दुधकोहळे, एल.एस. चंडारीया, नारायण आचार्य, सुब्रतदास, देवानंद उराडे, संजीवनदास, सुनील कुलस्वाहे, साक्षी कांबळे, दीक्षा चिचघाटे, सीमरण वावरे, आकांक्षा बेंदरे, तनवी कांबळे, गौरव सुरकार, विरेंद्र राठोड, अर्जुन पवार, सौरभ लाडेकर, अमर कुरसंगे, सोयल शेख, समीर साहु, आकाश अराडे, शिवदास गोडबोले आदी सहभागी झाले.