काँग्रेसचे तहसीलसमोर धरणे
By Admin | Updated: December 1, 2014 22:58 IST2014-12-01T22:58:14+5:302014-12-01T22:58:14+5:30
येथील काँगे्रस कार्यकर्त्यांच्यावतीने विविध मागण्यासाठी सोमवारी तहसील कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी भूगांवकर यांना सोपविण्यात आले.

काँग्रेसचे तहसीलसमोर धरणे
कृषीविषयक मागण्या : तहसीलदरांना निवेदन सादर
हिंगणघाट : येथील काँगे्रस कार्यकर्त्यांच्यावतीने विविध मागण्यासाठी सोमवारी तहसील कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी भूगांवकर यांना सोपविण्यात आले.
सादर केलेल्या निवेदनात सोयाबीन व धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपयांची आर्थिक मदत, कापसाला सहा हजार रुपये क्विंटल भाव देऊन बाजार भावातील फरकाची रक्कम बोनस म्हणून देणे, ओलिताच्या व बागायदार शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत, शेती कर्ज व वीज पंपाचे देयक माफ करण्याची व जवखेडा येथील हत्याकाडांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी नमूद आहे.
यंदा पावसाअभावी राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे सोयाबीनला उतारी नाही. कापसाला भाव नाही. अतिवृष्टीमुळे धान पीक नष्ट झाले तर अवकाळी पाऊस, वादळी वारा यामुळे फळबाग उद्ध्वस्त झाल्या. अपुऱ्या पावसामुळे विदर्भ मराठवाड्यासह राज्यात अन्यत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदन देताना काँगे्रसच्या जि.प. सदस्य उषाकिरण थुटे यांच्यासह रजनी वानखेडे, लता घवघवे, प्रा. दिवाकर गमे, डेहणे पाटील, प्रदीप आर्य, प्रा. येरळेकर, चंद्रकांत पिठाडे, दिनकर लांबट, गिता मांडवकर, अरुण परटक्के, सतिश चरडे, प्रफुल्ल महंतारे, दिनेश हरबडे, मारोतराव सवाई, शेख सरफू, नाना गंधारे, गोपाळ मांडवकर, राजू अवचट, वसंत खडसे, बाबाराव शेगोकर यांची उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)